खतगाव येथे आणा भाउसाठे जयंती साजरी, (आंनद करूडवाडे जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी बिलोली ) तालुक्यातील खतगाव येथे दि.21 ऑगस्ट 2025लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना खतगावकर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाकार्यावर प्रकाश टाकलणारे भाषण केले..अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य तळागाळातील माणसाच्या जीवनाचा वेध घेणारे आणि सामाजिक मूल्ये प्रतिबिंबित करणारे साहित्य आणा होते. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य समाजाचा आरसाच असून, माणसाला अंतर्मुख होऊन जीवन जगण्याची शिकवण देते, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे खाजगी सचिव बालाजीराव पाटिल खतगावकर यांनी केले. यावेळी गावातील नागरिक गोविंदराव पाटील, निळकंठरा सुरवंशी सरपंच प्रतिनिधी मल्लेश पेटेकर , शंकर पाटील, खतगाव च्या पो. पाटील राजश्री वाघमारे, व्यंकटराव मंडगे, यशवंत पाटील यांची विशेष उपस्थिती होती.तसेच गावातील , चेअरमन , ग्राम पंचायत सदस्य व गावातील नागरिक,मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मंडळाचे अध्यक्ष राजू सुरेश वाघमारे , उपाध्यक्ष. नागनाथ वाघमारे, सचिव. आकाश वाघमारे, चंद्रकांत शिवाजी वाघमारे , दीपक वाघमारे, श्रीनिवास वाघमारे , चंद्रकांत वाघमारे ,व्यंकट वाघमारे तसेच सर्व समाज बांधवांनी मेहनत घेतली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आदर्श कांबळे यांनी मांडले....
byMEDIA POLICE TIME
-
0