पानसरे प्राथमिक शाळेत दहीहंडी सोहळा उत्साहात धर्माबाद (गजानन वाघमारे)श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून येथील हुतात्मा पानसरे प्राथमिक शाळेत बाळगोपाळांचा दहीहंडी सोहळा उत्साहात पार पडला असून यावेळी चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हुतात्मा पानसरे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर पालकृतवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून हायस्कूलचे मुख्याध्यापक सन्मुख बेंबरेकर, सेवानिवृत्त कलाशिक्षक चंद्रशेखर आस्वार, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुदर्शन वाघमारे, सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती लक्ष्मीकांता बिगेवार, कराटे प्रशिक्षक दत्तात्रय सीतावर हे उपस्थित होते. सर्वप्रथम श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून सर्व सहभागी बाळ गोपाळांना शुभेच्छा देण्यात आल्या. दांडियाच्या संगीतावर नृत्य करीत विद्यार्थ्यांनी दहीहंडीचा आनंद घेतला. उत्साहाच्या वातावरणात बाळ गोपाळानी दोन थर करून दहीहंडी फोडली व जल्लोष साजरा केला. संस्थेचे सचिव विश्वनाथराव पाटील बन्नाळीकर, केंद्रप्रमुख आबासाहेब उस्केलवार, संस्थेचे अध्यक्ष राम पाटील बनाळीकर, कोषाध्यक्ष राम पाटील बाळापूरकर, सहसचिव सुरेश गंजेवार, डॉ. कमल किशोर काकानी, दिनेश सारडा, इनानी सेठ, नारायण शाहू, संचालक व विश्वस्त मंडळांनी दहीहंडी उपक्रमाचे व विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. दहीहंडी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सविता नोरलावार, सुनीता शाहू, अश्विनी रामोड, प्रणिता प्यादेकर, विठ्ठल नरवाडे, राजू सिदुलवार, रवींद्र राठोड, लक्ष्मण जाधव, विनायक बारदवार, हनुमंत शिंदे, बजरंग परसूरे, नविन लोकवाड, राठोड ताई, गुब्बी ताई, पंढरीनाथ दारमोड आदिनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाधव यांनी केले तर आभार विठ्ठल हिमगिरे यांनी मानले.

पानसरे प्राथमिक शाळेत दहीहंडी सोहळा उत्साहात 
Previous Post Next Post