*_बेटावद घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी - रावेर नागरिकांची मागणी_. *(रावेर/ प्रतिनिधी)बेटावर येथील घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी रावेर शहरातील नागरिकांनी निवेदन द्वारे केली आहे.या बाबत तहसीलदार रावेर यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की जामनेर तालुक्यातील बेटावद येथील सुलेमान पठाण नावाचा तरुणाची काही गुंडांकडून मॉमबिलींचिंग करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेतले आहे. जळगाव जिल्ह्यातील ही घटना दुरुदेवी व अतिशय दुखद घटना आहे जिल्ह्यात अशी घटना कधीही घडली नाही. निवेदनात आमच्या मागणी पुढील प्रमाणे बेटावद घटनेची निष्पक्ष व बारकाईने चौकशी करण्यात यावी - या सर्व घटनेतील गुन्हेगारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी - घटनेतील आरोपींचे व्यवसाय व त्यांची पार्श्वभूमी ची शुद्ध चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर शेख गयास, अब्दुल मुतल्लीब, युसुफ खान, अब्दुल रफीक, शेख सादीक, सैय्यद आरीफ,जी एक काझी, शेख एजाज, शेख सलीम,मलिक रहेमान, शेख युसूफ,तौसीफ अहमद, सैय्यद मजीत, सैय्यद अफसर, शेख आसीफ, यांच्या सहया आहेत.

_बेटावद घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी - रावेर नागरिकांची मागणी_.                                                    
Previous Post Next Post