यावल तालुक्यात सुद्धा विजेच्या धक्क्याने २ नीलगाईंचा मृत्यू झाल्याची चर्चा. जीवित हानी होण्याची दाट शक्यता. यावल दि.२१ ( सुरेश पाटील )शेती शिवारात वन्य प्राण्यांपासून शेती पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून विजेच्या तारा लावलेल्या असल्यामुळे त्याचा धक्का लागून २ नील गाई जागीच ठार झाल्याची चर्चा असून त्या मृत निल गायीवर कोणीतरी अज्ञातांनी गवत कापून झाकून टाकल्याने याबाबतची माहिती वन अधिकारी यांना मिळाली किंवा नाही आणि वन अधिकारी सातपुड्यात फिरत आहे की जळगाव जिल्ह्यात फिरस्ती करीत आहेत किंवा कसे याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केलेला आहे.तालुक्यातील अंजाळे शिवारात असलेल्या गोशाळा परिसरात रात्रीच्या सुमारास शेती पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून कोणीतरी शेताच्या आजूबाजूला इलेक्ट्रिक तारांमध्ये वीज पुरवठा सोडला असल्यामुळे २ दोन नील गाईंना वीजतारांचा शॉक लागून नील गाई त्याच ठिकाणी मृत्युमुखी पडल्याने त्या गाईंवर कोणीतरी अज्ञात इसमाने आजूबाजूचे गवत टाकून झाकून ठेवले असल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात आहे. विजेच्या तारांचा जोरदार धक्का लागून आज नील गाई मृत्युमुखी पडल्या असल्या तरी अद्याप त्यांनी लढाईचा पंचनामा करण्यासाठी कोणतीही शासकीय यंत्रणा पुढे आलेली नाही त्यामुळे वन अधिकारी आपल्या मुख्यालयाच्या ठिकाणी कार्यालयात आहेत का..? वन अधिकारी हे सातपुड्यामध्ये गस्त घालण्यासाठी गेले आहे की जळगाव जिल्ह्यात दुसरीकडे शासकीय कामानिमित्त आहे किंवा कसे .? यापुढे एखाद्या वेळेस मनुष्य जीवित हानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ उपाययोजना करून जनजागृती करायला पाहिजे अशी चर्चा आहे.

यावल तालुक्यात सुद्धा विजेच्या धक्क्याने २ नीलगाईंचा मृत्यू झाल्याची चर्चा. जीवित हानी होण्याची दाट शक्यता.                                                                                    
Previous Post Next Post