यशवंत प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेह संमेलन साजरे झाले. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. )सेलू : सेलू येथील यशवंत प्राथमिक शाळे मध्ये आज दि. 30 जाने.रोजी वार्षिक स्नेह संमेलन संपन्न झाले.या स्नेहसंमे लनाच्या अध्यक्षस्थानी यशवंत शिक्षण प्रसा रक मंडळाचे अध्यक्ष मुकेश हरिभाऊ काका बोराडे, संचालक साईराजभैय्या, तर प्रमुख पाहुणे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक माधव गव्हाणे सर होते.या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती मध्ये व्यंकटराव चव्हाण, राजेश झोडगावकर व डॉ.शिवाजी शिंदे, यशवंत प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गोरे सर व यशवंत विद्यालयाचे मुख्या ध्यापक थटवले सर आदींची उपस्थिती होते.कार्यक्रमची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.या नंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. कार्य क्रमाचे प्रास्ताविक गोरे सर यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय थटवले सर यांनी दिला. माधव गव्हाणे सर यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले त्याचबरोबर विविध उपक्रमांची माहिती दिली. विविध गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली.विविध क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक स्पर्धा त्याचप्रमाणे विविध स्पर्धा परीक्षां मध्ये यशस्वी विद्यार्थ्यां ना प्रमाणपत्र देण्यात आले.अध्यक्षीय भाषणात साईराज भैय्या मुकेशराव बोराडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी यशवंत प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.आभारप्रदर्शन वामन सर यांनी केले तर सूत्रसंचालन सौ. कानडे मॅडम यांनी केले.
byMEDIA POLICE TIME
-
0