*श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळा संपन्न. शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.ह भ प नामदेव महाराज ढवळे चारठाणकर यांच्या काल्याचे किर्तनास भाविकांची प्रचंड जन समुदाय उपस्थित. सेलू : दि.3 फेब्रुवारी सोमवार रोजी शहरातील विठ्ठल रुक्माई मंदिर परिसरात श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज जन्मोऊत्सव सोहळा निमित्त भव्य आणि दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, गाथा भजन व तुकाराम महाराज चरित्र कथा सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.श्री संत तुकाराम महाराज जीवन चरित्रकार ह भ प मुकुंद महाराज मोरे श्री क्षेत्र देहू श्री संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज यांच्या अमृततुल्य वाणीतून कथा वाचन करण्यात आली.या अखंड हरिनाम सप्ताहाचे नेतृत्व ह भ प नामदेव महाराज ढवळे चारठाणकर यांच्या नेतृत्वात झाले.सप्ताह काळात गाथा भजन हरिपाठ कीर्तन तसेच तुकाराम महाराज जीवन चरित्र कथेचे आयोजन करण्यात आले होते सकाळी 11 ते 1व रात्री 8 ते 10 कीर्तनाचे आयोजन होते.दि 27जानेवारी ते 3 फेब्रुवारी या काळा तील सप्ताहाचीसांगता ह.भ.प.नामदेव महाराज ढवळे चारठाणकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.यावेळी मृदंग चार्य दत्ता महाराज चारठाणकर तर गायन साथ मारोती महाराज वाघ, राम महाराज वाघ, रामेश्वर महाराज पवार,माऊली महाराज चव्हाण,मोहन महाराज हातकडके,सोपान महाराज चव्हाण, महादेव महाराज बोराडे, सदाशिव महाराज जाधव, गिरी महाराज,पूरी महाराज,तर विशेष उपस्थिती म्हणून प्रसाद महाराज काष्टे,प्रशांत महाराज खानापूरकर,बापूसाहेब महाराज खवणे शिवाजी दादा खवणे,अशोक महाराजआकात,अमोलमहाराज बोधले, संजय महाराजपिंपळगावकरमाणिक महाराज चव्हाण, सुनील गायकवाड, सुधाकर पवार, विठ्ठल आकात, बाबासाहेब पावडे पांडुरंग कदम, आनंदे आप्पा,मधुकर सोळंके दत्तराव पावडे, बापू थोरात,जनाआबा सोळंके,शिवाजी शिंदे, शुकाचार्य शिंदे, तसेच विद्यानगर भागातील व पंचक्रोशीतील भाविक भक्त उपस्थित होते. महा पंक्तीची यजमान विद्यानगर मित्र मंडळ यांच्या वतीने महा प्रसादाचे आयोजन करण्यात आले या सप्ताह काळात देणगी दार यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले तसेचउपस्थितांचे आभार व सूत्रसंचालन बापूसाहेब महाराज खवणे, प्रशांत महाराज खानापूरकर यांनी मानले.

श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळा संपन्न.                                                                                        
Previous Post Next Post