डॉ हिना गावित विक्रमी गॅस वाटपामुळे शेगळी चिन्हांची सालतय जादू. (सुरतान पावरा तालुका प्रतिनिधी अक्राणी)आपण एक असा आमदार अनुभवला ज्यांना ३५ वर्षात कोणत्याही विकास करता आला नाही. खासदार म्हणून माला संधी दिली तेव्हा मी या भागात रोजगारापासून सोयीसुविधा पर्यंत सर्व दिले. वर्षानूवर्ष दुर्लक्षित अक्कलकुवा - अक्राणी चा दुर्गम भाग प्रगतीच्या प्रमुख प्रवाहात आणायला असेल तर आपण सर्व मतदारांनी पुन्हा एकदा विश्वासाने शेगडीच्या चिन्हावर शिक्का मारुन माला संधी द्यावी तुम्ही परीवर्तन कळवा मी या भागाचा कायापालट घडवून दाखवेल; असे आवाहन अक्कलकुवा विधानसभातील मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माझी खासदार संसद रत्न डॉ हिना गावित केले आहे. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात दोन माजी मंत्री एक विद्यमान आमदार एक खासदार असा चौरंगी सामना रंगत आहे मात्र अपक्ष उमेदवार डॉ हिना गावित यांनी खासदार असताना अक्कलकुवा- अक्राणी तालुक्यात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मतदारांच्या समोर आहे. त्यामुळे सध्या गावात पाड्यांमधून सालू असलेल्या त्यांचा प्रचार फेऱ्यांचा आणि गाव सभा इतर उमेदवारांच्या तुलनेत मोठा प्रतिसाद दिसून येते आहे. विशेष महिला बचत गटांतील लाभार्थी महिला गॅस शेगडी वाटपासारख्या योजनांच्या लाभार्थीं महिलांच्या मोठा प्रतिसाद आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0