*यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेच्या लाभासाठी आमदार करणजी देवतळे यांना निवेदन*. (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती )भद्रावती दि.3 : वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील धनगर समाजाला यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेचा त्वरित लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र धनगर समाज महासंघ चंद्रपूर, यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. महासंघाचे जिल्हा अध्यक्ष रमेशराव बुच्चे यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन मा. आमदार करणजी देवतळे यांना देण्यात आले.यावेळी आमदार करणभाऊ देवतळे यांनी घरकुलचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. या निवेदनाच्या वेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये पत्रकार पुंडलिकराव येवले, समाजसेवक लिमेश माणूसमारे सर, माजी मल्हार सेना तालुका अध्यक्ष संदीपभाऊ मंदे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती आयोजक गणेश चिडे, शिवसेना उपशहर प्रमुख मनिष बुच्चे, सामाजिक कार्यकर्ते सुरज ढवळे आदींचा समावेश होता.या निवेदनाद्वारे धनगर समाजाच्या घरकुल योजनेच्या अडचणी लवकरात लवकर दूर करून लाभार्थ्यांना घरे मिळावीत, अशी मागणी करण्यात आली.

यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेच्या लाभासाठी आमदार करणजी देवतळे यांना निवेदन*.                       
Previous Post Next Post