सेलूत मन्मथ स्वामी जयंती उत्साहात साजरी. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.)शिवा संघटनेचा पुढाकार.सेलू : संत शिरोमणी शिवयोगी श्री मन्मथ स्वामी ह्यांचा ४६४ वा जयंती महोत्सवमोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील बंसीलाल नगर येथे रविवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी शिवा अखिल भारतीय विरशैव संघटनेच्या पुढाकाराने प्रदीप डफुरे यांच्या निवासस्थानीझालेल्या ह्या धार्मिककार्यक्रमात नंदकिशोर पारसकर , राजेंद्र स्वामी थळपती, सखारामआप्पा कानडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी भारत स्वामी यांनी पवित्र मंत्रोच्चारात प्रतिमा पुजन केले. तसेचसामूहीक शिवपाठ पठन व महाआरती करण्यात आली.शिवा संघटना सोशलमिडीया राज्य सदस्य प्रदीप अप्पा डफुरे यांनी श्री मन्मथ स्वामींचे जीवन चरित्रावर प्रकाश टाकला तसेच शिवा संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवा संघटनेचे तालुकाध्यक्ष निजलींगअप्पा तरवडगे ,सुत्र संचलन उपजिल्हाप्रमुख शिव कुमार नावाडे तर शहरप्रमुख प्रकाश साखरे यांनी आभार मानले.कार्यक्रमासाठी बबनआप्पा झमकडे, नवनाथ सोनटक्के, देवराव चौरे, गणेश गोरे चंद्रशेखर रुगले, शिवशंकर महाजन, बाळकृष्ण केदारी, राम कटारे, नागनाथ तमशेटे, गुरुबसअप्पा पंचगल्ले, जनार्धन पाचलेगावकर, सुधाकर गबाळे,सौ. सुषमा तडवडगे, राजश्री शिवणकर, शारदा नावाडे, डफुरे सुनीता, शिवलीला थळपती, वंदना थळपती, नम्रता मिटकर, शिला गबाळे, बिहाडे यांची उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वी तेसाठी सुनिल नवघरे, शैलेश डफुरे,शशिकांत बिहाडे. सुजित मिटकरी, विशाल साखरे, प्रकाश कोलीपाका हनुमंत लिंगे ह्यांनी सहकार्य केले.
byMEDIA POLICE TIME
-
0