*चुंचाळे तालुका यावल येथे मुबारक तडवींचे दारू विक्री विरोधात आमरण उपोषण*. (चोपडा प्रतिनिधी मनसुर तडवी.) यावल तालुक्यातील आंदोलन आणि उपोषणाने नवाजलेली चुंचाळे ग्रामपंचायत येथे आमरण उपोषणाची सुरुवात १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित साधून गावात दारूबंदी झालीच पाहिजे तसेच ठराव मंजूर करून सहा महिने झाले तरी ग्रामपंचायत ग्रामसेवक सरपंच उपसरपंच व सदस्य यांनी आज पर्यंत कोणतीच कार्यवाही केली नाही यात माझी फसवणूक केली आहे संबंधितावर देखील कार्यवाही व्हावी म्हणून मुबारक तडवी यांचे आमरण उपोषणाला सुरुवात होत आहे सविस्तर वृत्त असे की चुंचाळे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्य यांनी दिनांक ८/१०/२०२४ रोजी घेण्यात आलेल्या मासिक सभेमध्ये ठाराव क्रमांक आठ मे गावात दारूबंदी ठराव एक मताने मंजूर करण्यासंदर्भात मुबारक नबाब तडवी यांच्या ५/९/२०२४ रोजी गावात दारूबंदी करण्या संदर्भात अर्ज सचिव यांनी वाचून दाखविले त्यावेळी उपस्थित सदस्य सरपंच उपसरपंच यांनी विचार व नियम करून गावात दारूबंदी करण्यात यावी असे सभेत सर्वांनी एक मताने ठरविले होते सदर ठराव पुढील कार्यवाहीसाठी दारूबंदी विभाग जळगाव यांना पाठविण्यात यावा असा ठराव करण्यात आलेला होता. व आहे आज रोजी सहा महिने होऊन देखील कोणतीच कारवाई करण्यात आली नसून दारू मोठ्या प्रमाणात गावात विक्री केली जात आहे दारू विक्री करणारे म्हणतात आम्ही पोलिसांना हप्ते देतो म्हणून दारू विक्री आमची चालूच राहील कितीही ग्रामसभाचे ठराव केले तरी आमचे काहीच होणार नाही अशा प्रकारचे भाष्य करत असतात याबाबतचे निवेदन मुबारक तडवी यांनी दिनांक २/४/२०२५ रोजी पोलीस निरीक्षक यावल पोलीस स्टेशन यांना दिले होते मात्र आज पर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही म्हणून १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून त्यांनी ग्रामपंचायत चुंचाळे ग्रामसेवक सरपंच उपसरपंच व सदस्य यांच्या व दारू विक्री करणाऱ्या च्या विरोधात बंड पुकारले आहे अशी माहिती मुबारक तडवी यांनी दिली आहे
byMEDIA POLICE TIME
-
0