रावेर तालुक्यातील मुंजलवाडी शिवारात विना लायसेन्स चे ट्रॅक्टर ड्रायव्हरांकडुन अवैध वाहतूकीमुळे वाहनंधारक प्रवाशांचा जीव धोक्यात. ( रावेर प्रतिनिधी) रावेर तालुक्यात अनेक महिन्यांपासून गौण खनिज आणि मातीची ट्रॅक्टर ही अव्वाच्या सव्वा भरती भरुन कसे तरी दारुच्या नशेत मुंजलवाडी परिसरातील ट्रक्टर ड्रायव्हर अवैध वाहतुक करीत असल्याचे चित्र समोर आले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की रावेर ते पाल हा रस्ता हायवे बनल्याने ह्या भागात दिवसेंदिवस विना लायसेन्स चे ड्रायव्हर ट्रॅक्टर द्वारे अवैध वाहतूक करीत आहे आणि वाहन चालविण्याची गती देखील कशी तरी चित्रं विचित्र प्रकारे वाहतूकीचे चित्र परिसरातील जनतेला दिसत आहे अशा ह्या बेवळ्या ड्रायव्हरांच्या ट्रॅक्टर वाहतुकीमुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहन धारकांच्या जीवाला अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे तरी संबंधित अधिकारी प्रशासनाने यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन बेभान दारुच्या नशेत ट्रॅक्टर चालवणाऱ्या ट्रक्टर ड्रायव्हरांच्या मुसक्या आवळल्या पाहिजे जेणेकरून हे ड्रायव्हर त्यांचे ट्रेक्टर संथगतीने आणि रेग्यलर स्पीड ने आपले ट्रॅक्टर चालवतील तरी संबंधित अधिकारी प्रशासनाने यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन बेभान विना लायसेन्स ट्रक्टर चालवणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई करावी अशी परिसरातील जनतेची आणि वाहन धारक प्रवाशांची मागणी आहे..
byMEDIA POLICE TIME
-
0