कंत्राटी वायरमनसह वीज वितरण कंपनीला लागला जळगाव लाच लुचपत विभाग कारवाईचा झटका आणी शॉक.रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल. (.यावल दि.१० ( सुरेश पाटील ) ५ हजार रुपयाची लाच तक्रारदाराला मागितल्याने जळगाव येथील प्रभात कॉलनी कक्षातील कंत्राटी वायरमन भूषण शालिग्राम चौधरी यासह वीज वितरण कंपनीला जळगाव लाच - लुचपत विभागाचा कारवाईचा जोरदार झटका लागल्याने वीज वितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रात मोठी खळबळ उडाली. याबाबत सविस्तर माहिती अशी की तक्रारदार यांच्या राहते घराचे वीज मीटर हे पूर्वीचे मालक यांच्या नावे असल्याने महावितरण तर्फे वीज मीटर बदलण्याचे कार्य चालू असताना ३ दिवसापूर्वी वीज वितरण कंपनीत कंत्राटी असलेला वायरमन भूषण शालिग्राम चौधरी हे जळगाव येथील प्रभात कॉलनी कक्षातील तक्रारदार यांच्या घरी वीज मीटर बदलण्यासाठी आले असता त्यांनी तक्रारदार यांना सांगितले की,तुमच्या वीज मीटरचे सील तुटलेले असून तुम्ही त्यात छेडछाड केल्याने तुम्हाला आर्थिक दंड होऊन तुमच्यावर वीज चोरीचा गुन्हा दाखल होईल.वीज चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी व वीज मीटर टेस्टिंगचा रिपोर्ट ओके देण्यासाठी आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे १५ हजार रुपयांची लाचेची मागणी करीतअसल्याबाबत दि.१० जून २०२५ रोजी तक्रार प्राप्त झाली होती.त्या प्रमाणे आज मंगळवार दि.१० जून रोजी पडताळणी केली असता आरोपीने पंचासमक्ष ५ हजार रुपये लाचेची मागणी करुन लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविली.म्हणून आज सापळा कारवाई आयोजित केली असता आलोसे याने पंचसमक्ष ५ हजार रुपयांची लाच स्वीकारली म्हणून त्यासताब्यात घेण्यात आले असून रामानंदनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रियासुरु आहे.कंत्राटी वायरमनच्या या लाच खोरीच्या कृत्यामुळे वीज वितरण कंपनी सुद्धा सुद्धा बदनाम झाली असून वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराबाबत सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.पर्यवेक्षण अधिकारी.योगेश ठाकूर पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि. जळगांव.मोबा.नं.9702433131सापळा व तपास अधिकारीपोलीस निरीक्षक स्मिता नवघरेसापळा पथक स.फौ.सुरेश पाटील चालक पो.हे.कॉ. / सुनील वानखेडेपो.कॉ. /अमोल सूर्यवंशी मार्गदर्शक 1)श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र,नाशिक. मो.क्र.9371957391 आलोसे यांचे सक्षम अधिकारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता,म.रा.वि.वि.,जळगाव सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेहीशासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.अँन्टी करप्शन ब्यरो जळगाव.अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार,जळगांव @ दुरध्वनी क्रं. 0257-2235477@ मोबा.क्रं. 9702433131 @ टोल फ्रि क्रं. 1064 अशी माहिती दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात जळगाव येथील लाच लुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी दिली आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0