यावल शहरात घाणीचे साम्राज्य पसरल्याने डासांचे प्रमाण वाढले.नागरिकांचे आरोग्य धोक्यात. आरिफ अयुब खान सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गट यांनी नदीपात्र स्वच्छतेची यावल नगरपालिका मुख्य अधिकाऱ्याकडे केली मागणी. यावल शहरातील प्रभाग क्रमांक दोन इस्लामपुरा भागात नदीच्या वर नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूकडील ठेकेदाराने टाकलेल्या मातीच्या भरवामुळे नदी मधले पाणी वाहून न जाता व त्या ठिकाणी जमत असलेल्या पाण्यामुळे तेथे डासाची उत्पत्ती वाढल्यामुळे दोन्ही बाजूकडील नागरिकांचा आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रोगराई पसरणारी शक्यता नाकारता येणार नाही म्हणून आपल्याला या निवेदनाद्वारे कळविण्यात येते की आपण तीन दिवसाच्या आत अस्वच्छता निर्माण झालेल्या ठिकाणी स्वच्छता करण्यात यावी जर आपण या अर्जाची दखल घेतली नाही आणि त्या भागातील रहिवाशांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर याला संबंधित अधिकारी व मक्तेदार यांना दोषी ठरवण्यात येईल अस आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार गटाचे सामाजिक कार्यकर्ते आरिफ आयुब खान यांनी केलआहे

यावल शहरात घाणीचे साम्राज्य पसरल्याने डासांचे प्रमाण वाढले.नागरिकांचे आरोग्य धोक्यात.                            
Previous Post Next Post