**मानवत येथे एम.आय.एम. चे आमदार मूफ्ती महमंद ईस्माईल यांनी उद्योजक युनूस मिलनवाले यांची घेतली भेट.**. (मानवत )> अनिल चव्हाण.*) ————————————————मालेगाव येथील एम.आय.एम. पक्षाचे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल हे मानवत तालूक्यातील पाळोदी येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी वेळात वेळ काढून मानवत शहरातील प्रसिद्ध उद्योजक मा. युनुससेठ मिलनवाले यांच्या निवासस्थानी भेट दिली. या महत्वपूर्ण भेटीदरम्यान सामाजिक, धार्मिक तसेच राजकीय विषयांवर सखोल चर्चा करून विचार मंथन करण्यात आले. यावेळी मानवत शहरातील मुस्लिम समाजातील नामवंत धर्मगुरू मौलाना सलीम, मौलाना सुलतान, मौलाना हमिद,मुफ्ती मोहम्मद मुजाहिद,मौलाना मुजाहिद, मौलाना इमरान खान नदवी, मौलाना असलम,हाफेज अकबर, हाफेज अय्याज,जुनेद खान,व एम.आय.एम. पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते मोहम्मद मुस्ताक हे देखील या महत्वपूर्ण बैठकीला अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी घेण्यात आलेल्याा महत्वपूर्ण चर्चा दरम्यान विविध सामाजिक प्रश्नांवर विचारमंथन करण्याले असून, मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक उपाय योजनांवरभर विचार मंथन करण्यात आले. यावेळी मुस्लिम समाज बांधवांची या प्रसंगी मोठ्या संख्खेने उपस्थिती होती.***

**मानवत येथे एम.आय.एम. चे आमदार मूफ्ती महमंद ईस्माईल यांनी उद्योजक युनूस मिलनवाले यांची घेतली भेट.**.                                                                                  
Previous Post Next Post