*जळगांव जिल्ह्यांच्या तालुक्यात वावडदा, म्हसावद, कुऱ्हाडदे येथे सट्टा व्यवसाय खुलेआमपणे सुरु असल्याची जोरदार चर्चा .सट्टा जुगारामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त.होण्याच्या मार्गावर. पोलिस प्रशासनाचा जाणिव पुर्वक कानाडोळा . (जळगाव जिल्हा क्राईम रिपोर्टर भुषण भालेराव) जिल्ह्यातील वावडदा येथे बस स्टॉप समोर श्रीहरी इलेक्ट्रिकल्स च्या बाजूला सट्टा व्यवसाय बिनधास्त राजरोसपणे सुरु असल्याचे चित्र समोर आले आहे. या सट्टा मटका जुगाराचे लोभामध्ये तरुण पिढी सह वयस्कर मंडळी व जेष्ठ नागरिक सट्टयाच्या आहारी गेल्याने ह्या तरुण पीढीसह अनेकांचे संसार उद्धवस्त होतांना दिसत आहे .या सट्टा मटका जुगाराला भली मोठी मदत आणि चालना देण्याचे काम हे पोलिस प्रशासनाकडुन होत असल्याचे जिल्ह्यातील जनतेकडुन बोलले जात आहे. या सट्टा चालकाचे पिढ्या म्हसावद, कुऱ्हाडदे येथेही सुरु असल्याची परिसरातील जनतेकडुन जोरदार चर्चा सुरू आहे .याकडे पोलीस प्रशासन कार्यवाही करेल का ? असा सवाल मात्र परिसरातील जनतेला आता खुप त्रास देऊ लागला आहे ..जेणे करून तरुण पिढी व वयस्कर लोक हे लोभापोटी बळी पडू नये. म्हणून तात्काळ जिल्हा पोलिस अधीक्षक साहेब यांनी गांभीर्याने लक्ष देऊन सट्टा मटका मध्ये व्यसनाधिन झालेल्या सर्वसामान्य जनतेचे जीवन वाचवावे आणि ह्या संबंधीत गावात, शहरात, जिल्ह्यात सुरू असलेल्या सट्टा मटका पिढ्या बंद कराव्या..अशी रास्त स्वरुपाची मागणी वरीष्ठ नागरिकांसह परिसरातील जनतेने पोलिस प्रशासनाकडे केली आहे..

जळगांव जिल्ह्यांच्या तालुक्यात वावडदा, म्हसावद, कुऱ्हाडदे येथे सट्टा व्यवसाय खुलेआमपणे सुरु असल्याची जोरदार चर्चा .सट्टा जुगारामुळे  अनेकांचे संसार उद्धवस्त.होण्याच्या मार्गावर. पोलिस प्रशासनाचा जाणिव पुर्वक कानाडोळा 
Previous Post Next Post