धर्माबाद पोलीस ठाण्याच्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांची पदोन्नती. (धर्माबाद : तालूका प्रतीनीधी सज्जन संतोष ). धर्माबाद येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या तीन पोलिस कर्मचारी यांची पदोन्नती झाली असून त्यांचे पोलीस ठाण्यातील कर्मचारी व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.धर्माबाद शहरातील बाळापुर बीटचे पोलीस हेडकॉन्स्टेबल विलास मोतीराम मुस्तापुरे यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी तर कारेगाव बीटचे पोलीस अंमलदार पोलीस हेडकॉन्स्टेबल सोमनाथ शंकराप्पा मठपती यांची देखीलसहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. धर्माबाद पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे पोलीस नाईक साईनाथ शंकर बादेवाड यांची पोलीस हेडकॉन्स्टेबल पदी निवड झाली आहे. ८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पोलीस स्टेशन धर्माबाद येथे तीन कर्मचाऱ्यांची पदोन्नती झाल्याने त्यांना सन्मानितकरत पदोनत्ती बहाल करण्यात आले आहे. यावेळी पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर, पोलिस उपनिरीक्षक प्रियांका पवार, माधव लोणेकर व सर्व पोलीस कर्मचारी हे हजर होते. तीन पोलीस कर्मचाऱ्यांची पदोनत्ती झाल्याने त्यांचे अभिनंदन केले आहे.

धर्माबाद पोलीस ठाण्याच्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांची पदोन्नती.                                                                             
Previous Post Next Post