गोवंश गुन्हातील दोघांना सहा दिवसांची कोठडी. (आंनद करूडवाडे बिलोली जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ) बिलोली ता: दि,८शेळगाव थडी येथे सोमवारी (ता.७) कतलीच्या उद्देशाने गोवंश जनावरांना तेलंगणा राज्यात घेऊन जात असताना कुंडलवाडी पोलिसांनी पकडून दोघांना अटक केली होती.ट्रकचालक रशीद मोहम्मद करिमोद्दीन (वय ३८, रा. इस्लामपूर, ता. मालपुरा, जिल्हा टोंक, राजस्थान) आणि खय्युमखाँ जुम्माखाँ (वय ३६, रा. चांद की ढाणी इस्लामपुरा, ता. मालपुरा, जि. टोंक, राजस्थान) अशी अटकेतील संशयितांची नावे असून, त्यांना न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलिस कोठडीसुनावली.मध्य प्रदेशातील सिवनी येथून नागपूर, नांदेड, बिलोली, कुंडलवाडी मार्गाने ट्रकमधून (एमपी ०७ एचबी ७६८०) कत्तलीच्या उद्देशाने निर्दयपणे कोंबून २६ जनावरांना घेऊन जात होते. कुंडलवाडी पोलिसांनी शेळगाव थडी येथे ट्रक पकडून ३१ लाख ८० हजार रुपयांच्या मुद्देमालासह दोघांना अटक केले होती. त्यांना बिलोली न्यायालयात हजर केले असता प्रथम न्याय दंडाधिकारी विशाल घोरपडे यांनी सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक गजेंद्र मांजरमकर करीत आहेत.

गोवंश गुन्हातील दोघांना सहा दिवसांची कोठडी.              
Previous Post Next Post