हुतात्मा पानसरे प्राथमिक शाळेच्या सौ अश्विनी रामोड यांना द बेस्ट टीचर अवार्ड २०२५ घोषित. शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी दिला जाणारा इंडियन टॅलेंट ओलंपियाड मुंबई मार्फत द बेस्ट टीचर अवॉर्ड महत्त्वाचा गणला जाणारा पुरस्कार दिलाजातो. सन २०२५२६ या वर्षासाठी बेस्ट टीचर अवार्ड २०२५ हा पुरस्कार पानसरे प्राथमिक शाळेत शिकवणाऱ्या सौ अश्विनी रामोड यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, रोख रक्कम व भेटवस्तू अशा स्वरूपाचे आहे. सदरील पुरस्कार सोहळा ९ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबई येथे होणार असून या कार्यक्रमासाठी पांडिचेरी येथील राज्यपाल डॉक्टर किरण बेदी व पद्मभूषण विजेत्या सायना नेहवाल यांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा संपन्न होणार आहे. बेस्ट टीचर अवार्ड सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण पत्रिका पाठवून सन्मान सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी आर टी ओ मुंबई मार्फत आव्हान केले आहे. सदरील निवडीचे संस्थेचे अध्यक्ष राम पाटील बनाळीकर, संस्था सचिव विश्वनाथराव पाटील बनाळीकर, संचालक दिनेश सेठ सारडा, कैलास इनानी, रामचंद्र पाटील बाळापूरकर, सुरेश शेठ गंजेवार. नारायण शाहू, प्रत्रकार सज्जन संतोष व सर्व विश्वस्त मुख्याध्यापक पालकृतवार जी.ए. हायस्कूलचे मुख्याध्यापक सन्मुख बेंबरेकर, उपमुख्याध्यापक मोहन पुल कंठवार, पर्यवेक्षक जिंदमवार व सर्व स्टाफ, तथा सर्व शिक्षक तथा मित्र परिवारातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे
byMEDIA POLICE TIME
-
0