महावितरण कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार,सगरोळी सर्कलमध्ये 20 गावे, 4 दिवसापासून, अंधारात. (मारोती एडकेवार सर्कल :प्रतिनिधी सगरोळी )सगरोळी : वादळी वाऱ्यासह गेल्या 4 दिवसापासून, सगरोळी सर्कल मध्ये पावसाने जोरदार मुसंडी मारली आहे, अशातच मात्र एकाच पावसाने विजाची बत्ती गुल अशी परिस्थिती झालेली आहे,गेल्या 4 दिवसापासून,20 गावांमध्ये,वीज पुरवठा नसल्यामुळे अनेक नागरिकांना,अनेक अडचणी निर्माण होत आहेत. परंतु महावितरण अधिकारी, मात्र झोपेचं सोंग घेतले आहे, वीज पुरवठा नसल्यामुळे, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, दळण्याचे दळणवळणाचे प्रश्न, निर्माण होत आहेत, नागरिकांना रात्र रात्र जागून काढावे लागत आहे,पावसाळ्याच्या सुरुवातीलाच विजेचा असा लपंडाव, म्हणजे कर्मचाऱ्यांचे झोपेचा सोंग यात नागरिकांना मोठे संकटात परिस्थिती निर्माण होत आहे, पावसाळा असल्यामुळे विज लपंडाव झाल्यामुळे ग्रामीण, भागात खेडोपाडी, साप विंचू किडा हे भरकटत असतात, अशातच वीज नसल्यामुळे घरामध्ये जर त्यांचा प्रवेश झाला, तर मोठी जीवित हानी सुद्धा या ठिकाणी होऊ शकते,म्हणून महावितरण अधिकारी कर्मचारी यांनी झोपेच्या सोंग मधून उठावे, व वीज पुरवठा सुरळीत करावे अशी नागरिकांची विनंती आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0