यावल येथील मॉडर्न इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये आषाढी एकादशी निमित्त बाल दिंडी सोहळा साजरा.. (यावल प्रतिनिधी (रविंद्र आढाळे)यावल येथील मॉडर्न इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये आषाढी एकादशी निमित्त बाल दिंडी सोहळा या कार्यक्रम चे आयोजित करण्यात आले होतेया माध्यमातून वारकारी सांप्रदायिक महोत्सवाचे महत्त्व विशद केले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रूख्मिनी, संतांच्या आकर्षक वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर चिमूकले बालगोपालांनी विठ्ठल नामाचा जप करीत संपूर्ण परिसर भक्तीमय केला होता.महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा भाग असणारी आषाढी एकादशी सोहळा यंदा जल्लोषात व भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. कार्यक्रम ची सुरुवात विठ्ठल पूजन ने करण्यात आली. तसेच विदयार्थ्यांनी नृत्य देखील सादर केले.त्यावेळी मुलांच्या हातात भगवे ध्वज तर मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन हे बघून हे जणू खरच पंढरपूरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता. एरवी शाळेच्या गणवेशात असलेले लहान मुलं आज मात्र वारकऱ्यांप्रमाणे डोक्यावर टोपी, गळ्यात टाळ, कपाळी गंध आणि नऊवारीत आलेल्या मुली केसात गजरा, डोक्यावर तुळस आणि ‘विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहानभूक हरली,’ या अभंगाप्रमाणे विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत दंग झालेले बाल वारकरी ड्रिमलॅण्ड स्कूलमध्ये अवतरले होते. ज्ञानाच्या मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला आणि अवघी शाळा दिंडी सोहळ्याच्या भक्तिरसात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले.या प्रसंगी शाळेच्या संस्थाध्यक्ष निताताई गजरे, मुख्याध्यापिका जयश्री चौधरी, तसेच शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
byMEDIA POLICE TIME
-
0