नरसी ते देगलूर राष्ट्रीय महामार्ग 161 चौपदरीकरण होणार का.जिल्ह्यातील तिन्ही खासदार,लक्ष देतील का जनतेचा प्रश्न. (मारोती एडकेवार जिल्हा प्रतिनिधी नांदेड) नांदेड : राष्ट्रीय महामार्ग 161 मध्ये दक्षिण,भारतातील अकोला, वाशिम, हिंगोली,नांदेड नरसी,देगलूर, बिचकुंदा, पिठलंम, निजाम पेठ,शंकरांपॅट,जोगी पेठ,संघ रेड्डी आणि हैदराबाद शहर एकमेकांना जोडतो. परंतु नरसी ते देगलूर, ते 33.6 किमी रोड हा फक्त 2 पदरी रस्ता असल्यामुळे नरसी ते देगलूर ते 33.6 किमी या महामार्गाचा रोड वरती अपघाताची संख्या दिवसेंदिवस दिवस वाढत आहे, देगलूर शहर मोठे बाजारपेठ असून, नरसी सुद्धा चांगली मोठी बाजारपेठ आहे. बिलोली व देगलूर तालुक्यातील व तेलंगणातील अनेक नागरिकांचा दररोज नरसी व देगलूर येथे बाजारपेठेत खरेदी व विक्री करण्यासाठी, अनेक व्यापारी, व शेतकरी व सामान्य नागरिक येत असतात. तसेच नरसीजवळ शंकर नगर (रामतीर्थ ) या ठिकाणी मोठी शिक्षण संस्था असून, शाळेला जाण्यासाठी शाळेतील विद्यार्थी व शिक्षक वर्ग तसेच देगलूर सारख्या शहरात सुद्धा मोठे शिक्षण संस्था त्या ठिकाणी सुद्धा शिक्षक व विद्यार्थी येणे जाणे असते. पण या रोडवरती अनेक मोठमोठे अपघात वाढत आहेत दिल्ली, ते हैदराबाद चालणारे मोठे ट्रक, व मोठे वाहन या महामार्गावरून जात असतात. हा 161 महामार्ग चौपदरीकरण होईल का. अशा प्रश्नात नागरिक संभ्रमात आहे. बिलोली तालुक्यातील केरूळ घाट व देगलूर तालुक्यातील वन्नळी टोलनाकेच्या पुढचे घाट. या घाटामध्ये अनेक अपघात होत आहेत,राष्ट्रीय महामार्ग 161 हा दिल्ली ते हैदराबाद असल्यामुळे वाहनाची मोठी वर्दळ आहे. आणि महामार्गाच्या रोड मात्र दोन पदरी आहे. त्यामुळे या सर्व अपघातात अनेक नागरिकांचा जीव,वाचवण्यासाठी नांदेड जिल्ह्याला तीन तीन खासदार लाभले आहेत. यांनी याकडे लक्ष देतील का.राष्ट्रीय महामार्ग 161 चोपदरीकरण,होईल का? हा नागरिकांना खूप मोठा प्रश्न पडला आहे. त्यामुळे सर्व देगलूर व बिलोली तालुक्यातील जनतेकडून विनंती आहे. तिन्ही खासदारानी या बाबतीत लक्ष करून राष्ट्रीय महामार्ग 161 लवकरात लवकर चौपदरीकरण करण्याचे काम खासदारांनी करावं अशी विनंती जनतेतून होत आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0