शेतकऱ्यांची २ कोटी २७ लाख रुपयांची फसवणूक. (संतोष सज्जन तालुका प्रतिनिधि धर्माबाद )धर्माबाद दि. 6 धर्माबाद तालुक्यातील समराळा येथील शेतकऱ्यांना शेतीमालाला इतर व्यापाऱ्यांपेक्षा जास्त भाव देतो, असे सांगून शेतातील उत्पादित माल घेऊन शेतकऱ्यास शेतीमालाची २ कोटी २७ लाख २८ हजार ५७७ रुपयांची रक्कम न देता शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी पाच आरोपींविरुद्ध धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.धर्माबाद तालुक्यातील समराळा येथील शेतकरी बालाजी लक्ष्मण देवकर व इतर शेतकऱ्यांनी शेतातील सोयाबीन, हरभरा, तूर या शेतीमालास इतर व्यापाऱ्यांपेक्षा जास्त भाव देतो असे सांगितल्याने श्रीकृष्ण भुसार दुकान येथे २०२२ ते २०२५पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखलदरम्यान लक्ष्मण कोंडीबा देवकर, सायन्ना गंगाराम इप्तेकर, पोतन्ना सायन्ना इप्तेकर, बालाजी सायन्ना इप्तेकर व संजय गंगाधर देवकर (सर्व रा. समराळा) यांना विक्री केला. २६६४ क्विंटलचा शेतीमाल ज्याची किंमत २ कोटी २७ लाख २८ हजार ५७७ रुपये ही मालाची रक्कम मागण्यासाठी शेतकरी बालाजी देवकर हे व्यापाऱ्यांकडे गेले असता आरोपींकडून रक्कम देण्यास नकार देऊन शिवीगाळ करून शेतकऱ्यांची फसवणूक केली. या प्रकरणी शेतकरी बालाजी देवकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी लक्ष्मण कोंडीबा देवकर, सायन्ना गंगाराम इप्तेकर, पोतन्ना सायन्ना इप्तेकर, बालाजी सायन्ना इप्तेकर व संजय गंगाधर देवकर (सर्व रा. समराळा) यांच्याविरुद्ध धर्माबाद पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाअसून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माधव लोणेकर हे करीत आहेत.
byMEDIA POLICE TIME
-
0