पाडळसे ग्रामपंचायतीच्या कथित भ्रष्टाचाराची पोलीस बंदोबस्तात चौकशी; गावकऱ्यांचे लक्ष निष्कर्षाकडे पाडळसे (ता. यावल) | वार्ताहर - पाडळसे ग्रामपंचायतमध्ये सरपंच गुणवंती पाटील व ग्रामविकास अधिकारी एस सी वाघमारे यांनी १५ वित्त आयोग , ग्रामनिधीतून केलेल्या विकास कामांमध्ये भ्रष्टाचार केला असल्याचा तक्रारी अर्ज ग्रामपंचायत सदस्य सुदेश कडू बाविस्कर यांच्यासह काही सदस्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जळगाव यांच्याकडे केला होता. या तक्रारीची दखल घेऊन, आज, दि. १० जून रोजी चौकशी समिती गावात दाखल झाली. या समितीने पोलीस बंदोबस्तात ग्रामपंचायतीने वॉर्ड एक ते पाच अंतर्गत केलेली विविध विकास कामे, स्मशानभूमीतील पत्र्याचे शेड यासह गावातील जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची पाईपलाईन सह इतर कामांची पाहणी करून मोजमाप घेतले आहे.यापूर्वी ९ मे रोजी चौकशी समिती गावात आली होती, परंतु ग्रामविकास अधिकारी गैरहजर असल्याने ती चौकशी आज (१० जून) करण्यात आली. या चौकशीतून काय निष्पन्न होते, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. गावातील या कथित भ्रष्टाचार प्रकरणी आता पुढील काय कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. पाडळसे येथील सरपंच आणि सदस्यांमधील वादामुळे गावातील सामाजिक सलोखा धोक्यात आला असून, फैजपूर पोलिसांत परस्पर तक्रारी दाखल आहेत.
byमीडीया पोलीस टाईम
-
0