नांदेडमध्ये शिंदेगट शिवसेनेत मोठा बदल! (आंनद कुरुडवाडे बिलोलो तालुका प्रतिनिधि नांदेडः ) शहर उत्ताम गाजलवार यांची शिंदेगट शिवसेना उपशहर प्रमुख पदी नियुक्ती प्रिय आमदार आनंदराव तिडके पाटील बोंढारकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान नांदेड राजकारणात आज एक मोठा आणि निर्णायक बदल घडला आहे. शिवसेनेने संघटन बळकट करण्यासाठी मोठा निर्णय घेत उत्तम गाजलवार यांची शिवसेना उपशहर प्रमुख पदी अधिकृत निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार आनंदराव तिडके पाटील बोंढारकर यांच्या हस्ते करण्यात आली.या कार्यक्रमास शहरातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरात हा विषय चर्चेचा ठरला असून, शिवसेना संघटनेत नवचैतन्य निर्माण होईल, अशी जोरदार चर्चा सुरू आहे.यावेळी बोलताना आमदार तिडके यांनी सांगितले,शिवसेना ही सामान्य माणसाची ताकद आहे. पक्ष मजबूत ठेवण्यासाठी नवे नेतृत्व पुढे आणणे गरजेचे आहे. उत्तम गाजलवार हे निष्ठावान आणि सक्रिय कार्यकर्ते असून, त्यांच्या नेतृत्वात नांदेडमध्ये शिवसेनेची पताका अधिक उंचावेल याची मला खात्री आहे.उत्तम गाजलवार यांनी देखील पक्ष नेतृत्वाचे आभार मानत सांगितले की,पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचवणे, संघटना मजबूत करणे आणि जनतेच्या अडचणींवर लढा देणे हेच माझे प्राधान्य राहील.या निर्णयामुळे नांदेड शहरात शिवसेना अधिक आक्रमकपणे मैदानात उतरणार असून, आगामी काळात पक्षाचे स्थान अधिक भक्कम होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0