बिलोली तालुक्यातील ७३ ग्रा. पं. च्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर.. (आंनद कुरूडवाडे प्रतिनिधि तालुका बिलोली )बिलोली : तालुक्यातील ७३ ग्राम पंचायतीच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत २५ एप्रिल रोजी पार पडली होती मात्र शासन नवीन अध्यादेशानुसार परत नव्याने एकदा आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. यात काहींचा हिरमोड झाला आहे.७३ पैकी ३७ ठिकाणी महिलाराज सरपंचपदाला संधी मिळणार आहे. २०२५ ते २०३० कालावधीकरताचे आरक्षण सोडत लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठी काढून आरक्षण निश्चित करण्यात आले. आरक्षण सोडतसाठी प्रामुख्याने उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, तहसीलदार गजानन शिंदे, नायब तहसीलदार बालाजी मिठेवाड, नायब तहसीलदार निवडणूक विभाग दिपक मरळे, पोलीस निरीक्षक अतुल भोसले, पोलीस उपनिरीक्षक विजय पंतोजी यांची उपस्थिती होती तर राजेश आलमवाड, मोहन आकले, शेख युनुस, साईनाथ कुडके यांनी सहकार्य केले.अनुसूचित जाती - बाभळी (आ), नागणी, लघुळ, कार्ला (बु) कामरसपल्ली,दौलतापूर, हरणाळा, हुनगुंदा. अनुसूचित जाती महिला डौर, रामतिर्थ, चिटमोगरा, बिजुर,कोळगाव, अंजनी, सगरोळी, बामणी (बु), अनुसूचित जमाती - दौलापूर /कोटग्याळ, आळंदी अनुसूचित जमाती महिला कोंडलापूर / नाग्यापूर/सुलतानपूर, बेळकोणी (बु) नागरिकांचा मागास प्रवर्ग लोहगाव, आदमपूर, कार्ला (खु), पिंपळगाव (कुं), चिरली / टाकळी (खु), बोळेगाव, गागलेगाव, माचनुर, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला कासराळी, बोरगावथडी, थडीसावळी, तोरणा, गुजरी, बावलगाव, बेळकोणी (खु), हरणाळी/ममदापूर, चिंचाळा, भोसी, सर्वसाधारण - मुतन्याळ, जिगळा, केरुर, सावळी, मिनकी, खतगाव, कांगठी, हज्जापुर, पोखर्णी, दगडापुर, अटकळी, गंजगाव, खपराळा, बडुर, टाकळी (खु), रुद्रापुर. हिंगणी/दर्यापूर, सर्वसाधारण महिला हिप्परगामाळ, दुगाव, पाचपिंपळी, गळेगाव, कौठा, हिप्परगाथडी, कोल्हेबोरगाव, तळणी, कुंभारगाव, किनाळा, येसगी, केसराळी, रामपुरथडी, अर्जापुर, डोणगाव बु, चिंचाळा, भोसी, बोळेगांव, आरळी, डोणगाव (खु), शिंपाळा आदी ग्रा.पं. चे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

बिलोली तालुक्यातील ७३ ग्रा. पं. च्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर..                                                                 
Previous Post Next Post