ग्रामसेवक योगेश सुवर्णकार यांना निरोप तर बी,एस,काठेवाड हे रुजू झाले, (आंनद करूडवाडे बिलोली प्रतिनिधी ) ‌‌ बिलोली तालुक्यातील खतगाव येथे कार्यरत असणारे ग्रामसेवक योगेश सुवर्णकार यांची देगलूर पंचायत समिती येथे बदली झाली असल्याने त्यांना २६ रोजी गावकऱ्यांच्या वतीने निरोप देण्यात आला आहे. खतगाव ग्रामपंचायत कार्यालयात ग्राम पंचायत अधिकारी म्हणून दोन वर्षांपूर्वी रुजू झालेले ग्रामसेवक योगेश नरसिंमलू सुवर्णकार यांची नुकतीच प्रशासकीय बदली झाली आहे. त्यांच्या जागी ग्रामपंचायत अधिकारी म्हणून बी. एस. काठेवाडे हे रुजू झाले असल्याने त्यांचे स्वागत केले तर येथून बदलून गेलेल्या ग्रामविकास अधिकारी योगेश सुवर्णकार यांना निरोप देण्यात आला. यावेळी बाळासाहेब पाटील खतगावकर, सरपंच (प्र) मल्लेश पेटेकर, ग्रामसेवक जी. व्ही. सूर्यवंशी, प्रकाश बुद्धेवार, आनंदा पेटेकर, दादाराव वर्णे, सुभाष जाधव, साहेबराव वाघमारे, शिवकुमार पाटील, सुरेश पाटील, श्रीराम पाटील, अमृत पाटील सुभाष पाटिल, पत्रकार काशीनाथ वाघमारे, संभाजी चितले,जयवंत पाटिल,आदी उपस्थित होते.

ग्रामसेवक योगेश सुवर्णकार यांना निरोप तर बी,एस,काठेवाड हे रुजू झाले,                                          
Previous Post Next Post