भारतीय बौद्ध महासभा नांदेड दक्षिण तर्फे,गौतम वाघमारे वंचित आघाडी महासचिव, यांचा सन्मान करण्यात आला. (मारोती एडकेवार प्रतिनिधी/ नांदेड) नांदेड : नांदेड येथे भारतीय बौद्ध महासभा नांदेड दक्षिण,जिल्हा आयोजित गौरव गुणवंताचा सोहळा संपन्न झाला. प्रसिद्ध विचारवंत एडवोकेट सन्माननीय विजय गोणारकर साहेब, हिंगोली जिल्ह्याचे प्रशिक्षण अधिकारी डॉ.चंद्रकांत धुमाळ सर, नांदेड जिल्हा दक्षिणचे भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष हौसाजी वारगडे,नांदेड जिल्हा संघटक केके वाघमारे वनाळेकर, देगलूर तालुका अध्यक्ष मिलिंद बीर कंगन, महिला अध्यक्ष रेखाताई पंडित,चित्रा रेखा कांबळे,दीपक नरंगलकर ,बालाजी वारघडे, रिपब्लिकन सेना नांदेड जिल्हा दक्षिण अध्यक्ष अनिल शिरसे, उपस्थित होते. गुणवंताचा सत्कार वंचित बहुजन आघाडी देगलूर तालुका महासचिव गौतम वाघमारे, यांचं भारतीय बौद्ध महासभेकडून सन्मान करण्यात आले, तसेच गुणवंत विद्यार्थी दिशा गौतम वाघमारे, महाजन गौतम वाघमारे, दिशा नरंगलकर,संपदा माळे शहापूर,अनेक विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. गौतम वाघमारे, वंचित बहुजन आघाडी महासचिव यांचा कार्य मोठा असल्यामुळे, गोरगरीब, लोकांवरती अन्याय झाल्यास त्यांना न्याय मिळवून द्यायचं कार्य, वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून करत आहेत,दिन दलित लोकांना न्याय मिळवून द्यायची, त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. भारतीय बौद्ध महासभा नांदेड दक्षिण कडून अनेक,विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान करण्यात आला.
byMEDIA POLICE TIME
-
0