विनोद बोराडे मित्र मंडळ व गोविंद बाबा मित्र मंडळाच्या वतीने खाऊ वाटप व प्रतिमा भेट देऊन सन्मान. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.)सेलू : दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी आषाढी एकादशी निमित्त विनोद बोराडे मित्र मंडळ व श्री गोविंदबाबा मित्र मंडळ आयोजित असलेला शाळकरी मुलांच्या दिंडीचे स्वागत व फराळ वाटप कार्यक्रम अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडला.शाळकरी मुलांत अवतरलेले ते पांडुरंगाचे देखणे रूप अन् टाळ मृदुंगात दंग झालेले बालवारकरी पाहून मन आनंदून गेले,या सर्वांना फराळाचे वाटप करण्यात आले तसेच शाळेची दिंडी घेऊन आलेले मुख्याध्यापक यांना पांडुरंगाची प्रतिमा देऊन विनोद बोराडे मित्र मंडळ व श्री गोविंद बाबा मित्र मंडळाच्या तर्फे स्वागत करण्यात आले.यावेळी श्री गोविंद बाबा मित्र मंडळ व माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे,साईराज बोराडे, उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे,सेलू तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल, ग्राहक मंचाचे प्रांताध्यक्ष डॉ.मोरे, परभणी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस मिलिंद सावंत,पत्रकार संजय मुंडे, आपला माणूस सुनील गायकवाड आदी मित्र मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
byMEDIA POLICE TIME
-
0