"गुरु ब्रम्हा गुरू विष्णू,गुरू देवो महेश्वरा गुरू साक्षात परब्रम्ह,तस्मै श्री गुरुवे नमः" सद्गुरू एज्युकेशन सोसायटी संचलित,प्राथमिक विद्या मंदिर खेडी बु ".ता.जि.जळगाव येथे गुरूपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती गायत्री भंगाळे यांनी महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन केले.शालेय जीवनात गुरुचे महत्व किती आहेत याची माहिती त्यांनी दिली.तसेच शाळेतील उपशिक्षक जावेद तडवी,गणेश लोडते,भूषण जोगी यांनी विद्यार्थ्यांना गुरूपौर्णिमा बद्दल मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन शिल्पा झोपे यांनी केले,आभार पुनम चौधरी यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सोपान पाटील,ज्योती महाले,सविता चव्हाण,प्रमोद चौधरी आदींचे सहकार्य लाभले.
byMEDIA POLICE TIME
-
0