फुकटचे श्रेय लाटणाऱ्यांना जनता जागा दाखवेल-सौ. पूनमताई राजेश पवार . (धर्माबाद / तालूका प्रतिनिधी संतोष सज्जन ) विकासनिधी आमदार राजेश पवार यांचा आणि तो आम्हीच आणला अशी वल्गना करीत परस्पर भूमिपूजन करीत लोकांची दिशाभूल करणाऱ्यांना व फुकटचे श्रेय लाटणाऱ्यांना आगामी काळात जनता त्यांची त्यांना जागा दाखवेल, असे प्रतिपादन भाजपा नांदेड दक्षिणच्या जिल्हाध्यक्षा तथा आमदार राजेश पवार यांच्या पत्नी सौ.पुनमताई पवार यांनी केले.तालुक्यातील हासनाळी फाटा ते तेलंगणातील तानूरकडे जाणारा बहुप्रतीक्षित रस्त्याच्या ९४ लक्ष रुपयाच्या रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजन प्रसंगी सौ. पूनमताई पवार बोलत होत्या. तालुक्यातील राजापूर फाटा ते तेलंगणातील मुगळी या मोठया गावाला जोडणाऱ्या २ कोटी ५३लक्ष रुपयांच्या कामाचे भूमिपूजनही त्यांच्याहस्ते झाले. या कामामुळे तेलंगणातील तानुर मंडळ म्हणजे तालुक्यातील सर्व गावे धर्माबाद बाजारपेठेशी जोडली जाणार आहे.या गावांना रात्री दवाखाना लवकरात लवकर गाठता येणार आहे. आ. राजेश पवार यांनी उपरोक्त दोन्ही गावातील रस्त्यांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला होता. पण तो निधी आम्हीच आणला अशी वल्गना काहीजणांनी केली होती. यावेळी भाजपाचे विठ्ठलराव पाटील, विजय डांगे, चक्रेश पाटील, गुलाबराव पाटील, दत्ता हरी पाटील आवरे, पिराजी पाटील, गावातील आजी-माजी सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
byMEDIA POLICE TIME
-
0