सेलूतील जैन समाजाच्या आंतर-शालेय निबंध स्पर्धेला मोठा प्रतिसाद. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.)सेलू : दि 25 भगवान महावीर जन्म कल्याणकाच्या पवित्र प्रसंगी श्री नेमिनाथ दिगंबर जैन मंदिर,सेलू संस्थे द्वारा आयोजित आंतर-शालेय निबंध स्पर्धेत १० शाळांतील एकूण ४५० विद्यार्थ्यां नी सहभाग घेतला. स्पर्धेचे पुरस्कार वितरण समारंभ यशस्वीपणे पार पडला.स्पर्धेतील विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट लेखनासाठी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक तसेच उत्तेजनार्थ व विशेष लेखनासाठी विजेत्यांचा गौरव करण्यात आला.प्रथम पुरस्कार म्हणून ३० ग्रॅम चांदीचे नाणे, द्वितीय पुरस्कार २० ग्रॅम चांदीचे नाणे,तृतीय पुरस्कार १० ग्रॅम चांदीचे नाणे तसेच तीन उत्तेजनार्थ पुरस्कार म्हणून प्रत्येकी ५ ग्रॅम चांदीच्या नाण्यांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अमिताभ काला ,विशेष अतिथी किशोर काला, गीताराम कोकणे, दीपक बिनायके, शोभा बिनायके ,कीर्ती राऊत मंचावर उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन कश्मिरा बिनायके यांनी केले. प्रास्ताविक सपना काला यांनी केले. मंगला चरण विद्या काला, यादी वाचन राजश्री विश्वंभर, यांनी केले. मनोगत शिरीष संगई व अनिता बिनायके ,सुनिता काला यांनी व्यक्त केले. आभार प्रदर्शन मंगल देशमुख यांनी केले. स्पर्धेबद्दलची माहिती आणि निबंधांचे विशेष निरूपण सपना काला व पूर्णिमा गंगवाल यांनी केले.याप्रसंगी निबंध स्पर्धेचे उत्तम नियोजन केल्याबद्दल शोभा बिनायके, निलेश बिनायके,सपना काला, शमा बिनायके यांचा सर्व शाळे च्या वतीने सन्मान करण्यात आला.कार्यक्रम संस्थेने यशस्वी करण्यासाठी राधिका काला, वर्षा बिनायके , अमित काला, ईश्वर जैन आणि वैभव संगई यांनी विशेष मेहनत घेतली.पुरस्कार विजेत्या विद्यार्थ्यांच्या पालकांसह राजकुमार गंगवाल, राजेंद्र बिनायके, अशोक काला, आनंद काला, निलेश बिनायके, महावीर आँचलिया, नेमीचंद जैन आदी मान्यवर उपस्थित होते.या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्जनशीलते ला व लेखनाला व्यासपीठ मिळाले व भगवान महावीरांच्या तत्वज्ञानाचा अभ्यास करण्याचा योग आला.प्रथम-क्षितिजा कैलास खजिनेप्रिन्स इंग्लिश स्कूलसेलू द्वितीय क्रमांक –कु.दिपाली ऋषी शेळकेनूतन कन्या प्रशाला,तृतीय क्रमांक-अनुष्का गंगाधर खंदारे.नूतन कन्या प्रशाला.उत्तेजनार्थ –मैथिली अनिल गावंडे.नूतन कन्या प्रशाला.उत्तेजनार्थ-सुमेधा दादाराव ताजने. बाहेती बियाणे इंग्लिश स्कूल. उत्तेजनार्थ -तडवी मरिया तबसूम खालिद अली खान.यशवंत प्राथमिक स्कूल.
byMEDIA POLICE TIME
-
0