भाड मे जाए जनता और अपना काम बनता.सावदा फैजपूर परिसरात जुगार अड्डे अवैध धंदे बोकाळले? आणि सर्व मिलीबगत वाले शेफारले यांना लगाम लावणारा वरिष्ठ पोलिस अधिकारी काही मिळेना ? तालुक्याच्या जनतेमध्ये जोरदार चर्चा? ही अवैध धंदे कायमस्वरूपी बंद न झाल्यास पुढील अंकात सविस्तरपणे पर्दाफाश होणार ? (सावदा विशेष जिल्हा प्रतिनिधी) कोणाची माय मरो का कोणाचा बाप मरो सावदा परिसरातील जुगार अड्डे अवैध धंदे आम्ही बंद करणार नाही.हा आमचा जन्मसिद्ध रोजगार आहे अशी परिसरातील जनतेमध्ये पोलिस प्रशासनाविषयी जोरदार चर्चा सुरू असल्याचेही चित्र सध्या सुपरस्टार होण्याच्या मार्गावर आहे व जनतेकडुन ऐकण्यास मिळत आहे याबाबत अधिक माहिती अशी की रावेर तालुक्यातील सावदा शहर हे नावाजलेले सुप्रसिद्ध शहर बनानासिटी म्हणून ओळखले जाते याच परिसरात हजारो रूपयांची मजुरी कमावणारे मजुर देखील जुगार अड्ड्यांवर पैसे गमवायला काहीच मागे पुढे विचार करीत नाही कारण ह्या परिसरात जुगार अड्डे अवैध धंदेपासुन बेहिशोबी पैसा मिळत असल्याने लालच पणामुळे अनेकजण ह्या जुगार अड्ड्यावर पैसे गमावत असल्याने अनेकांचे संसार उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहेत वेळोवेळी अनेक व्रुत्तपत्रांमधय्ये बातम्या प्रकाशित करुन देखील सावदा फैजपूर परिसरातील पोलिसांवर कुठलाही परिणाम झाला नसल्याचे समजते.याला काय म्हणावे तेरी भी चुप और मेरी भी चुप की भाड मे जाय जनता और अपना काम बनता यामुळेच या सावदा परिसरात अवैध धंदे बोकाळले आहेत याबाबत अधिक माहिती अशी की मागील काळात सावदा परिसरातील अवैध धंद्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या मात्र अजुनही सावदा पोलिस प्रशासनावर अवैध धंदे जुगार अड्डे बंद करण्याबाबत प्रकाश पडला नसल्याचे चित्र दिसत आहे.या सर्व प्रकारांमध्ये चिरीमीरी मिळत असल्याचे परिसरातील जनतेकडुन बोलले जात आहे.. गुन्हेगारीच्या घटनांचा उगम होणारी पहिली पायरी ही जुगार अड्डे अवैध धंदे पासुनच सुरू होते हे सर्वांनाच माहीत आहे मग ही जुगार अड्डे अवैध धंदे बंद करायला विलंब का ? असा प्रश्न सध्या स्थितीत उपस्थित झाला आहे..तरी संबंधित जिल्हा पोलिस प्रशासनाने तात्काळ या प्रकारांकडे गांभीर्याने विचार करुन सावदा परिसरातील जुगार अड्डे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करावेत अशी मागणी तालुका सह जिल्हा च्या जनतेकडुन जोर धरू लागली आहे.ही अवैध धंदे जुगार अड्डे कायमस्वरूपी बंद न झाल्यास पुढील अंकात सविस्तरपणे पर्दाफाश होणार?
byMEDIA POLICE TIME
-
0