भद्रावती येथे स्पर्श थेरेपी सेंटरचे उद्घाटन.. (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती )भद्रावती दि.7:- भद्रावती येथील विश्वकर्मा नगर येथे स्पर्श थेरीपी सेंटर चे आज उद्घाटन सीडीसीसी बँक चंद्रपूर अध्यक्ष श्री रविंद्र शिंदे यांच्या हस्ते पार पडले. सोबतच त्यांचा सत्कार करण्यात आला.हा बहुमान दिल्याबद्दल स्पर्श थेरीपी सेंटरचे संचालक डॉ.प्रिती नितीन साव,श्री बबलू गोंड यांचे विशेष आभार व्यक्त करीत पुढील वाटचालीकरीता अध्यक्ष रविंद्र शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. उद्घाटन कार्यक्रमास सीडीसीसी बँक अध्यक्ष रविंद्र शिंदे यांच्यासह श्री.माटे महाराज, आचार्य परमानंद तिराणीक,श्री.पाचपो,किर्तीताई पांडे,श्री.नितीन साव आदी मान्यवर उपस्थित होते.

भद्रावती येथे स्पर्श थेरेपी सेंटरचे उद्घाटन..                           
Previous Post Next Post