*न्यू व्यकंटेश हाॅस्पीटल मानवत यांच्या संयूक्त विद्यमाने डॉ. माधुरी काळे यांच्या पुढाकाराने गोर गरिब जनतेसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन*– शेकडो रुग्णांची तपासणी, आयुष्यमान कार्ड वाटप.. (मानवत / प्रतिनिधी.)———————— "आरोग्य हेच खरे धन" या विचाराला साकार करत पाथरी येथे दिनांक ७ ऑगस्ट रोजी एक भव्य मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन मानवत येथील न्यू व्यंकटेश हॉस्पिटल, मानवत येथील बालरोग तज्ञ डॉ. विठ्ठल काळे यांच्या मार्गदर्शना खाली घेण्यात आले. यावेळी आरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनाचा पुढाकार डॉ. माधुरी काळे यांनी घेतला.शिबिरामध्ये शेकडो गरीब नागरिकांनी सहभाग नोंदविला. गरजू व गोरगरीब रुग्णांची सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली. बालरोग, महिलांच्या आरोग्य समस्या, रक्तदाब, मधुमेह आदी विविध आजारांची तपासणी तज्ज्ञ डॉक्टर यांच्यामार्फत करण्यात आली. यावेळी रुग्णांना आवश्यकतेनुसार मोफत औषधे ही वितरित करण्यात आली.या बरोबर आयुष्यमान भारत योजना अंतर्गत मोफत आरोग्य कार्डांचे वाटप करण्यात आले. या कार्डाच्या माध्यमातून गरजूंना पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचारांची सुविधा मिळू शकते. शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेबद्दल नागरिकांना सविस्तर माहिती देण्यात आली.या वेळी कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना डॉ. माधुरी काळे म्हणाल्या, "गोरगरीब व गरजू रुग्णांपर्यंत शासनाच्या आरोग्य सुविधा पोहोचाव्यात, यासाठीच आम्ही हा उपक्रम राबविला आहे. अशा सेवा उपक्रमांचे आयोजन भविष्यातही सातत्याने करण्यात येईल." या शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात डॉ तोसिफ कामरान, डॉ अन्सारी,रेणुका वाव्हळे, आरोग्य मित्र दिव्या घागरे शामल रनखांबे,यांचे मोलाचे योगदान लाभले. त्यांच्या नियोजनामुळे शिबिर सुरळीत पार पडले. नागरिकांनी या उपक्रमाचा उत्स्फूर्त लाभ घेतला असून, डॉ. माधुरी काळे व त्यांच्या टीमच्या सेवाभावी कार्याची प्रशंसा सर्वत्र होत आहे.हा उपक्रम आरोग्यदूत यांच्या सारखा ठरला असून, अशाच प्रकारचे शिबिरे ग्रामीण व उपेक्षित भागातही आयोजित व्हावीत, अशी अपेक्षा यावेळी सामान्य नागरिकांनी व्यक्त केली....***
byMEDIA POLICE TIME
-
0