बोरगाव थडी येथील पूरग्रस्त भागाची बालाजी पाटील खतगावकर यांच्या कडून पाहणी. (आंनद करूडवाडे नांदेड़ ग्रामीण प्रतिनिधि रामतिर्थ ) सर्कल मधील बोरगाव थडी येथील पुरग्रसत भागाची पाहाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे खाजगी सचिव बालाजी पाटील खतगावकर यांच्या कडून मागिल काही दिवसा खाली झालेल्या अतिवृष्टी मुळे झालेल्या पावसामुळे येथील शेतकऱ्याशी संवाद साधुन नुकसानग्रस्त भागाची व पिकांची पाहणी करून तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश व सुचना दिल्या लवकरच व पुलाची मागणी पूर्ण करण्यात येईल असे शेतकऱ्यांना आश्वासन दिले.पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस, सोयाबीन . उडिद, मुग, मोठ्या प्रमाणात पावसामुळे आडवे पडून व काही शेतकऱ्यांच्या शेतामधून पूर वाहिल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे बोरगाव धडी व तालुक्यातील शेतकऱ्यांना पंचनामे करून तत्काळ आर्थिक मदत करावी अशी उपमुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव बालाजी खतगावकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व जिल्हाधिकारी याकडे मागणी केली आहे. यावेळी मधुकर गिरगावकर,शिवसेना तालुकाप्रमुख बाबाराव रोकडे, वसंत जाधव, माजी पंचायत समिती सभापती, चेअरमन हाणमंतराव गजले, उपसरपंच राजु पाटील हाके, आनु महाराज, माजी सरपंच, गावातील ग्रामपंचायत चे माजी सरपंच गावातील शेतकरी व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

बोरगाव थडी येथील पूरग्रस्त भागाची बालाजी पाटील खतगावकर यांच्या कडून पाहणी.                                         
Previous Post Next Post