क्रांतिवीर काळुजी नाईक यांच्या वारसावर झालेला अन्याय सहन केला जाणार नाही-ज्ञानेश्वर अहिरे --------------------------------क्रांतिवीर काळोजी नाईक यांच्या वारसावर होत असलेला अन्याय कदापिही सहन केला जाणार नाही व त्यांची इनामी वडीलो पार्जीत शेतजमीन नियमानुसार त्यांच्या वारसांना देण्यात यावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीडित कुटुंब बेमुदत आमरण उपोषण सुरू करेल असा इशारा एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात ज्ञानेश्वर अहिरे यांनी म्हटले आहे की क्रांतिवीर काळोजी नाईक यांची नेवासा तालुक्यात बेलपिंपळगाव येथे इनामी जमीन आहे. परंतु गावातील राजकारण्यांनी संगणमत करून शासकीय दरबारी चुकीची माहिती दिली. व ही जमीन इतर लोकांना वाटण्यात आली. व काळू नाईक यांना वारस असतानाही जमिनीची परस्पर वाटप झाली. परंतु या वारसदारांनी जमिनीचा ताबा सोडला नाही. आमचा हक्क असताना इतर लोकांनी आम्हाला विनाकारण त्रास द्यायला सुरुवात केली आहे अशी भावना या वारदारांची आहे. या आदिवासींना गावातून खूप त्रास असून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. येथील आदिवासी भिल्ल समाज अतिशय त्रस्त झाला असून महिलांना देखील शिवीगाळ व दमबाजी केली जात आहे. तसेच नेवासा पोलिसांकडून या आदिवासींना कोणताही न्याय मिळत नाही उलट दमबाजी करून पोलीस स्टेशन वरून हाकलून दिले जाते. असा प्रकार या ठिकाणी सुरू आहे. तरी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष घालून या आदिवासींची हक्काची जमीन त्यांना परत करावी तसा रीतशीर ताबा त्यांना देण्यात यावा व संबंधित अन्याय करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा अन्याग्रस्त भिल्ल समाज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करेल असा इशारा ज्ञानेश्वर अहिरे यांनी दिला आहे. यावेळी माजी सैनिक संपतराव मोरे व अन्यायग्रस्त आदिवासी भिल्ल समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
byMEDIA POLICE TIME
-
0