**के.के.एम.* महाविद्यालयात भव्य ग्रंथ प्रदर्शन.*. (मानवत / बातमीदार.* *{ अनिल चव्हाण. }**————————————* 02 ऑक्टोबर गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती याचे औचित्य साधून के. के. एम. महाविद्यालय, मानवत येथे भव्य ग्रंथ प्रदर्शन”* दिनांक 6ऑक्टोबर २०२५ रोजी महाविद्यालयात प्राध्यापक व विद्यार्थ्यांसाठी महात्मा गांधी वरील ग्रंथ व लालबहादूर शास्त्री यांच्यावरील ग्रंथ या आधारित भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख प्रो. एस .बी. राऊत यांच्या हस्ते संपन्न झाले. डॉ व्यास चेतनकुमार, डॉ लांडगे पंडित,डॉ जाधव विनायक उपस्थित होते.मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घेतला.यावेळी विध्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्ती पत्रकाचे विमोचन करण्यात आले.प्रदर्शनाच्या वेळी ग्रंथपाल डॉ. सचिन चोबे यांनी सूत्रसंचालन केले. उद्घाटनानंतर डॉ शारदा राऊत मॅडम यांनी विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना सविस्तर मार्गदर्शन केले. या ग्रंथ प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रंथालय कर्मचारी श्री. बोचरे, श्री. गुंडाळे, श्री. मिटकरी व श्री. शिंदे यांनी परिश्रम घेतले.**

के.के.एम.* महाविद्यालयात भव्य ग्रंथ प्रदर्शन.*.                   
Previous Post Next Post