नाशिक येथिल शिवसेना जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बूथप्रमुख कार्यशाळा आणि पदाधिकारी मेळावा आज मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. यावेळी शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी शिवसैनिकांना संबोधित करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. नाशिक जिल्हा शिवसेनेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी ५० लाखांची मदत जाहीर करण्यात आली. यावेळी राज्यात पूरपरिस्थिती असल्याने यंदा आपण शिवसेनेचा दसरा मेळाव्याला पूरग्रस्त भागातील शिवसैनिकांना न येता त्यांच्या विभागातील नुकसानग्रस्त नागरिकांना मदत करण्याचे आवाहन केले होते. दसरा मेळावा सुरू होण्यापूर्वी आपण १५ ते २० ट्रक भरून मदत पूरग्रस्त भागाकडे रवाना केल्याचे याप्रसंगी नमूद केले. आपल्या शिवसैनिकांनी पूरग्रस्त भागात जाऊन लोकांची मदत करून त्यांची घरे स्वच्छ करून देत त्यांना मदत देऊन त्यांचा दसरा गोड करण्याचा प्रयत्न केला. 'आपत्ती तिथे शिवसैनिक' आणि 'संकट तिथे एकनाथ शिंदे प्रकट' हेच पक्षाचे सूत्र असून त्यानुसार आपण काम करत असल्याचे यावेळी शिंदे साहेबांनी अधोरेखित केले. सरकार म्हणून शेतकऱ्यांना आपण वाऱ्यावर सोडणार नाही, आणि लागले तर सर्व निकष बाजूला ठेवून त्यांना मदत करणार असल्याचे याप्रसंगी शिंदे साहेबांनी ठासून सांगितले. नाशिक येथे पुढील वर्षी कुंभमेळा होणार असून त्याची तयारी देखील आता सुरू होणार आहे. त्यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांचा कुंभमेळा देखील सुरू होणार असून त्याचीही तयारी आपल्याला करायची आहे. त्यासाठी मतदार यादीकडे विशेष लक्ष द्यावे, ती अचूक तयार करावी, त्यासाठी तयार करण्यात आलेल्या ऍप्लिकेशनचा वापर करावा. नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी सज्ज व्हावे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पक्षाचा पाया असल्याने त्यात यश मिळवण्यासाठी सर्वांनी सज्ज रहावे असे आवाहन याप्रसंगी शिंदे साहेबांनी केले.... ( चोपडा जळगाव विभागीय उपसंपादक संजीव शिरसाठ..)
नाशिक येथिल शिवसेना जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बूथप्रमुख कार्यशाळा आणि पदाधिकारी मेळावा आज मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. यावेळी शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी शिवसैनिकांना संबोधित करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. नाशिक जिल्हा शिवसेनेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी ५० लाखांची मदत जाहीर करण्यात आली. यावेळी राज्यात पूरपरिस्थिती असल्याने यंदा आपण शिवसेनेचा दसरा मेळाव्याला पूरग्रस्त भागातील शिवसैनिकांना न येता त्यांच्या विभागातील नुकसानग्रस्त नागरिकांना मदत करण्याचे आवाहन केले होते. दसरा मेळावा सुरू होण्यापूर्वी आपण १५ ते २० ट्रक भरून मदत पूरग्रस्त भागाकडे रवाना केल्याचे याप्रसंगी नमूद केले. आपल्या शिवसैनिकांनी पूरग्रस्त भागात जाऊन लोकांची मदत करून त्यांची घरे स्वच्छ करून देत त्यांना मदत देऊन त्यांचा दसरा गोड करण्याचा प्रयत्न केला. 'आपत्ती तिथे शिवसैनिक' आणि 'संकट तिथे एकनाथ शिंदे प्रकट' हेच पक्षाचे सूत्र असून त्यानुसार आपण काम करत असल्याचे यावेळी शिंदे साहेबांनी अधोरेखित केले. सरकार म्हणून शेतकऱ्यांना आपण वाऱ्यावर सोडणार नाही, आणि लागले तर सर्व निकष बाजूला ठेवून त्यांना मदत करणार असल्याचे याप्रसंगी शिंदे साहेबांनी ठासून सांगितले. नाशिक येथे पुढील वर्षी कुंभमेळा होणार असून त्याची तयारी देखील आता सुरू होणार आहे. त्यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांचा कुंभमेळा देखील सुरू होणार असून त्याचीही तयारी आपल्याला करायची आहे. त्यासाठी मतदार यादीकडे विशेष लक्ष द्यावे, ती अचूक तयार करावी, त्यासाठी तयार करण्यात आलेल्या ऍप्लिकेशनचा वापर करावा. नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी सज्ज व्हावे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पक्षाचा पाया असल्याने त्यात यश मिळवण्यासाठी सर्वांनी सज्ज रहावे असे आवाहन याप्रसंगी शिंदे साहेबांनी केले. नाशिक शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांना दिले असल्याचे सांगून सिडकोची जमीन फ्री होल्ड करण्याचा निर्णय घेऊ, कांदा उत्पादकांना न्याय देण्याची विनंती अमितभाई शाह यांना करण्यात आली असल्याचे यावेळी सांगितले. तसेच शहरातील बंद असलेली सार्वजनिक सभागृह आणि व्यायामशाळा खाजगी संस्थांच्या मदतीने सुरू करू असेही शिंदे साहेबांनी जाहीर केले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील आणि उबाठा गटातील संगीता पाटील, सचिन धोंड्ये, संदीप पाटील, जितेंद्र जाधव, सज्जन कलासरे, ज्योती गायकवाड, अनिल गायकवाड आणि इतर पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, शिवसेना सचिव राम रेपाळे, माजी खासदार हेमंत गोडसे, उपनेते अजय बोरस्ते, आमदार किशोर दराडे, आमदार नरेंद्र दराडे, जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, माजी नगरसेवक प्रवीण तिदमे, माजी नगरसेवक विलास शिंदे, युवासेनेचे आविष्कार भुसे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
byMEDIA POLICE TIME
-
0