*के.के. एम.महाविद्यालयात जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेचे आयोजन**. (मानवत / बातमीदार.**(अनिल चव्हाण.)**—————————————**स्वामी रामानंद तीर्थ* विद्यापीठ नांदेड व के. के. एम.महाविद्यालय मानवत यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी जिल्हास्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धा 2025- 26 चे आयोजन बुधवार दिनांक 8/ 10/ 2025 रोजी शहरातील के.के. एम. महाविद्यालय मानवत जिल्हा परभणी या ठिकाणी होणार असून जिल्हाभरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक एकत्र येणार आहेत. या स्पर्धेचे आयोजन महाविद्यालय स्तर, जिल्हास्तर,विद्यापीठ व राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या संशोधनात्मक व नावीन्यपूर्ण प्रकल्पांचे सादरीकरण करण्याची संधी मिळते. एकूण सहा विषयांमध्ये ही स्पर्धा पार पडणार असून विविध शाखातील विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी मिळत आहे. स्पर्धेच्या निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भास्कर मुंडे यांनी आवाहन केले आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे संशोधनात्मक माध्यमातून नवे विचार, नवीन नवीन संकल्पना मांडाव्यात अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशील वृत्तीला बळ मिळते.हा प्रोग्राम यशस्वी होण्यासाठी विविध समित्या घटित करण्यात आल्या आहेत.समन्वयक डॉ. एस. के. शिंदे,उपप्राचार्य. डॉ. के.जी हुगे, आयकुएसी समन्वयक डॉ. कैलास बोरुडे आणि सहकारी मित्र परिश्रम घेत आहेत.***
byMEDIA POLICE TIME
-
0