सेलूत रविवारी दिव्यांग मेळावा. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.)पालकमंत्री मेघना साकोरे _ बोर्डीकर यांची उपस्थिती.सेलू : संघर्ष दिव्यांग संघटना सेलू या संघटनेच्या वतीने रविवार दि. 12 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता दिव्यांग मेळावा आयोजित केला असून या मेळाव्याचे उद्घाटन राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. मेघना दीदी बोर्डीकर करणार आहेत.मागील पाच वर्षापासून सेलू शहर आणि तालुक्यात दिव्यांगांच्या प्रश्नांवर काम करणारे, दिव्यांगाच्या सुखदुखात वेळोवेळी सहभागी असणारे दिव्यांगांचे आधारस्तंभ अशोक नाना काकडे यांच्या वाढदिवसा निमित्त संघर्ष दिव्यांग संघटनेच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्या त परभणी जि.प.मा.सभापती अशोक नाना काकडे यांचे दिव्यांग संघटनेच्या वतीने अभिष्टचिंतन करण्यात येणार आहे. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष किशोर साळवे हे असणार असून मेळाव्याला मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ. राजाराम झोडगे हे उपस्थित राहणार आहेत. पाहुणे म्हणून सेलूचे उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपककुमार वाघमारे, तहसीलदार शिवाजी मगर, मुख्याधिकारी तुकाराम कदम, सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ.संजय रोडगे, सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती दिनकर भाऊ वाघ, डॉ.जनार्धन गोळेगांवर, सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संचालक रामेश्वरजी राठी, उद्योजक महेशजी खारकर, मा .शफिक खान, अ.भा.मराठी पत्रकार संघाचे सेलू तालुकाध्यक्ष लक्ष्मण बागल, व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवाजी आकात, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश काटकर, भाजपा सेलूचे शहराध्यक्ष अशोक शेलार, भाजपा सेलू तालुका महिला आघाडी अध्यक्षा सौ.ज्योतीताई मोगल, डॉ. सौ. अनुपमा किशोर जवळेकर, भाजपा महिला आघाडी शहराध्यक्ष सौ.संध्याताई चिटणीस,अशोक उफाडे, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात कै. अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्था सेलू या संस्थेच्यावतीने दिव्यांगांना भेटवस्तूचे वितरण करण्यात येणार आहे. सर्व दिव्यांग बांधवांनी सकाळी नऊ वाजता सभागृहात उपस्थित राहण्याचे आवाहन संघर्ष दिव्यांग संघटनेच्या वतीने अब्रार पठाण, शेख अबरार, पप्पू चव्हाण, शेख नासर, प्रकाश भाले, जावेद पठाण, सदाशिव राखुंडे, गोविंद अवसारे, सय्यद चांदभाई, शेख आसमा, सलमा पठाण , शेख अहमद ,अनिस तांबोळी, मोबीन अंसारी, गणेश पडुळे, माजीद बागवान, संदीप फुलारे, अमित राठोड शेख हामजा भाई,सौ.ज्योती गायकवाड, सौ रेखा चव्हाण, सौ. बेबी साळवे, सौ संगीता पवार, कु. मंगल शिंदे, शेख शमीना, सौ. अंजना वखरे, सौ. संगीता मोरे, सौ. गीता डाके, श्रीमती जनाबाई चव्हाण, शेख शकीलाबाजी हे आदींनी केले आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0