सेलू येथे “क्युरिऑसिटी सायन्स अँड इनोव्हेशन अॅक्टिव्हिटी सेंटरचे भूमिपूजन. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.)श्रीराम प्रतिष्ठानचा उपक्रम :- अनुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांची उपस्थिती.सेलू :- राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग महाराष्ट्र व श्रीराम प्रतिष्ठान, सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने, परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात “क्युरिऑसिटी सायन्स अँड इनोव्हेशन अॅक्टिव्हिटी सेंटर” या महत्वाकांक्षी विज्ञान केंद्राचे भूमिपूजन सोहळा आज (ता.११) शनिवार रोजी प्रिन्स इंग्लिश स्कूल येथे आयोजित करण्यात आला आहे.या भूमि पूजन कार्यक्रमाचे उद्घाटक अणुशास्त्रज्ञ, अध्यक्ष राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान कमिशन महाराष्ट्र राज्य, माजी अध्यक्ष भारतीय अणुऊर्जा मंडळ तथा भारत सरकार अणुऊर्जा विभाग अधिकारी डॉ. अनिल काकोड कर तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान कमिशनचे सचिव डॉ. एन.जी. शहा, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान कमिशनचे वैज्ञानिक दिनेश जगताप, श्री. तुळजाभवानी शुगर प्रा.लिचे चेअरमन, भावनाताई बोर्डीकर आदी मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे.तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभाग छत्रपती संभाजीनगर उपसंचालक, जलील शेख साहेब, सेलू उपविभागीय अधिकारी शैलेशजी लाहोटी, परभणी शासकीय वैद्यकीय महविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्टता, डॉ. सदानंद भिसे , इ.मा.ब.क. परभणी विभागाचे सहाय्यक संचालक, रामेश्वर मुंढे, जिप. परभणीचे शिक्षणाधिकारी सविता बिरगे सुनीलजी पोलास, सेलू तहसीलदार डॉ. शिवाजी मगर, उपशिक्षणाधिकारी गोविंद मोरे , सेलू गटशिक्षणाधिकारी मनोज चव्हाण आदी मान्यवरासह सेलू शहरातील शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. या केंद्राच्या स्थापनेमागील मुख्य उद्देश म्हणजे शालेय व कॉलेजा तील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा वाढवणे, प्रयोगात्मक शिक्षणाला चालना देणे व नवकल्पनांची जाणीव निर्माण करणे. या सेंटरमुळे जिल्ह्या मतील विद्यार्थी दूरगामी अभ्यासापासून प्रेरणा घेतील, आणि भविष्यात संशोधन/उद्योग क्षेत्रात वाटचाल करण्यास मदत होईल.क्युरिऑसिटी सायन्स सेंटरमध्ये विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा, इनोव्हेशन हब, VR लॅब, ३D थिएटर, इन्फोटेन्मेंट पार्क, स्विमिंग पूल, इनडोअर स्टेडीयम, 5D थिएटर, रोबोटिक लॅब, तारांगण कक्ष, वैज्ञानिक प्रात्य क्षिक कक्ष, शैक्षणिक खेळ, क्रिकेट टर्फअशा आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत."या कार्यक्रमाचे औचित्त साधून विज्ञान यात्रेचे आयोजन ज्ञानतीर्थ विद्यार्थ्यांपासून सकाळी ८.३० वैज्ञानिक पथकाची परेड काढण्यात येणार आहे. श्रीराम प्रतिष्ठानच्या विविध घटक संस्थेचे वैज्ञानिक देखावे या यात्रेत असणार आहे.शास्त्रज्ञ आपल्या भेटीला.. श्रीराम प्रतिष्ठान च्या स्कॉलर विद्यार्थ्या करिता व खास विज्ञान शिक्षकां साठी प्रेरणादायी ‘विज्ञान चर्चा सत्र’ डॉ. अनिल काकोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आला आहे." यातुन "विज्ञान प्रयोग स्पर्धा, प्रश्नमंजुषा आणि विविध प्रदर्शनांमधून विद्यार्थ्यां च्या सर्जनशीलतेला नवी दिशा मिळणार आहे."या कार्यक्रमा प्रसंगी "मग चला, या ऐतिहासिक विज्ञान महोत्सवाचा साक्षीदार व्हा... मोठ्या संखेने विध्यार्थी, पालक व नागरिकांनी उपस्थित राहवे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांनी केले आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0