ड्रग तस्कर हिंगणघाट पोलिसांच्या ताब्यात. उपविभागीय पोलीस अधीकारी कार्यालय येथील पोस्टाँफ व पोउपनि हरीहर सोनकुसरे सा. व गुन्हे प्रगटीकरन पथकाचे अंमलदार हे पोलीस स्टेशन हिंगणघाट परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना मुखबिर कडुन खात्रीशीर खबर मिळाली की, यशवंत नगर, हिंगणघाट येथे राहणारा केतन देशपांडे नावाचा ईसम हा त्याचेजवळ असलेल्या मोटार सायकलने मँफेड्रान नावाचा मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ विक्री करण्याचे उद्देशाने बाळगून वर्धा रोडने मँगी पाँईट जवळील सर्व्हीस रोडने हिंगणघाट कडे घेवून येत आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहीती मा. श्री. सुशीलकुमार नायक साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी हिंगणघाट व मा. पोलीस निरीक्षक अनिल राऊत सा. यांना देवून त्याचे आदेशाने विशाल मँगी पाँईट, सर्व्हीस रोड हिंगणघाट येथे जावून सापळा रचून नाकेबंदी करून सदर दोन इसमांस ताब्यात घेतले असता त्याने त्याचे नाव, पत्ता, विचारले असता त्यांनी त्यांची नावे केतन कृष्णा देशपांडे वय 20 वर्ष रा. यशवंत नंगर, हिंगणघाट जि.वर्धा व मोटार सायकलचे पाठीमागे बसून असलेल्या ईसमाने त्याचे नाव प्रियांश रवी येणकोतकर वय 19 वर्ष रा. पोथरा काँलनी, हिंगणघाट जि.वर्धा असे सांगितले. पंचासमक्ष त्याची कायदेशीर रित्या झडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये 1) एका प्लॉस्टीकच्या पन्नी मध्ये मॅफेड्रान नावाचा मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ भरून त्याचे एकुण प्लॉस्टीक पन्नीसह वजन 10.13 ग्रॅम 18,560 रू 2) एक जुनी वापरती हिरो होन्डा कंपनीची पँशन प्रो गाडी क्र. एमएच 32 एच 5791 जिचा चेसीस क्रमांक 04M09C21597 किंमत 20,000 रू 3) दोन जुने वापरते अँपल कंपनीचा आयफोन किंमत 1,55,000 रू असा जू.किं. असा जु.किं. 1,93,560 रू चा माल मिळुन आल्याने पंचासमक्ष जप्ती पंचनामा कार्यवाही करून सदर माल जप्त करून आरोपीविरूध्द एनडीपीएस अँक्ट कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. ही संपूर्ण कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक अनुराग जैन साहेब, मा.अप्पर पोलीस अधीक्षक सदाशीव वाघमारे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुशीलकुमार नायक सा. व मा. पोलीस निरीक्षक श्री अनिल राऊत सा. हिंगणघाट यांचे यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात मा. उपविभागीय पोलीस अधीकारी कार्यालय, हिंगणघाट येथील पोस्टाँफ पो.हवा.अश्विन सुखदेवे,चेतन पिसे, राहुल साठे, सतीश घवघवे, उमेश लडके, पो.ना. रवी घाटुर्ले, पो.शि. अनंता हराळ,दीपक मस्के, भारत बुटलेकर, राकेश इतवारे, व पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील पोउपनि हरीहर सोनकुसरे सा. डि.बी. पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना राजेश शेंडे, पोशी आशिष नेवारे,पो.शि. मंगेश वाघमारे, पोशी रोहीत साठे यांनी संयुक्तिक रित्या कार्यवाही केली. सदर गुन्हयांच पुढील तपास सपोनि संगीता हेलोडे मँडम पो.स्टे हिंगणघाट करत आहे.

ड्रग तस्कर हिंगणघाट पोलिसांच्या ताब्यात.      
Previous Post Next Post