मंदाताई गोपाळराव केसराळीकर यांच,वृद्धपकाळाने निधन.... . (मारोती एडकेवार जिल्हा प्रतिनिधी नांदेड)नांदेड: बिलोली तालुक्यातील केसराळी येथील रहिवाशी कै. गोपाळराव नारायणराव केसराळीकर यांच्या पत्नी शेतकरी संघटनेच्या नांदेड जिल्हा माजी महिला आघाडी प्रमुख मंदाताई गोपाळराव केसराळीकर यांचे, दिनांक 6 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्यावर उद्या दिनांक 7ऑक्टोबर, रोजी सकाळी साडेनऊ वाजता अंतिम संस्कार केसराळी येथे करण्यात येणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाचे स्वातंत्र्यसैनिक व माजी आमदार कै. नारायणराव नरसिंगराव केसराळीकर यांच्या त्या सुनबाई होत.त्यांच्या पश्चात तीन मुलं एक मुलगी, सुना, नातू, नाती असा मोठा परिवार आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0