मासळ क्षेत्रात अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त; वनविभागाची धडक कारवाई* (महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती )भद्रावती दि.26 :- भद्रावती वनपरिक्षेत्रातील मासळ परिसरात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननावर वनविभागाने आज सकाळी मोठी कारवाई केली. सकाळी अंदाजे 6.34 वाजताच्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारे वनक्षेत्राधिकारी श्री. के. डब्लू. धानकुटे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने छापा टाकून एम.एच. 33 एफ 2038 क्रमांकाचा लाल रंगाचा ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केला. हा ट्रॅक्टर भद्रावती तालुक्यातील भद्रावती येथील रुपेश नामदेव उरकुंडे यांच्या मालकीचा असल्याचे समोर आले आहे. सरकारी वनक्षेत्रातील मासळ नाल्यातून अवैधरित्या रेती उत्खनन करून वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. वाहनचालकाकडे रेती उत्खनन किंवा वाहतूक परवान्याबाबत कोणतेही अधिकृत कागदपत्र नसल्याचे वनअधिकाऱ्यांना तपासात आढळून आले. त्यानंतर संबंधित ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त करून वाहनमालकाविरुद्ध वनगुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई वनक्षेत्र अधिकारी श्री. के. डब्लू. धानकुटे यांच्या नेतृत्वात क्षेत्र सहाय्यक श्री. एस. आर. वाखरे, वनरक्षक श्री. आर. एस. आकोळकर यांच्या पथकाने केली. या धडक मोहिमेमुळे अवैध रेती उत्खनन करणाऱ्या माफियांना मोठा धक्का बसला असून पुढील तपास वनविभागाकडून सुरू आहे.

मासळ क्षेत्रात अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त; वनविभागाची धडक कारवाई*                                                               
Previous Post Next Post