कृषि उत्पन्न बाजार समिती धर्माबाद तर्फे सर्व शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, गुमास्ता व हमाल बांधवांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभ दीपावली. शेतकरी बांधवांना आवाहन याद्वारे शेतकरी चांधवांना विनंती पुर्वक कळविण्यात येते की,१) शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्री करण्यापूर्वी शेतमाल वाळवून, सुकवून, स्वच्छ करून आणावा तसेच खरेदीदार हा धर्माबाद बाजार समितीचा लायसन्सधारक व्यापारी आहे काय याची खात्री करून घ्यावी.२) शक्यतांवर आपला शेतमाल मार्केट यार्डातच विक्रीस आणावा. आपला माल विकल्यावर खरेदीदाराकडून न चुकता बाजार समितीची हिशेब पट्टी (पिवळी पावती) घ्यावी.३) कोऱ्या कागदावर, चिट्टीवर व्यवहार अजिबात करु नका.४) कृपया अनामत व्यवहार, कंडिशनल व्यवहार करु नका. थोडक्या पैश्याच्या अमिषाला बळी पडून स्वतःची फसवणूक करून घेऊ नका.५) कृपया बाजार भावाकडे लक्ष ठेवत जा. शेतीमालामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी मंदी होत असल्यामळे अनामत व्यवहारातून आर्थिक धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.६) गल्यावर्षी अनामत व्यवहार कंडिशनल व्यवहार तसेच कोऱ्या कागदावरील व्यवहार केलेल्या बऱ्याच शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलेला आहे.७) जर कोणताही व्यापारी बटाव, कट्टी, आडत किंवा इतर कोणताही छुपा खर्च आकारुन शेतकऱ्यांची आर्थिक लूट करीत असल्यास तसेच पिवळी पट्टी देण्यास नाकारत असल्यास बाजार समितीला कळवावे. अशी माहिती देणाऱ्या शेतकऱ्याचे नाव उघड करण्यात येणार नाहा गुप्त ठेवण्यात येईल याची नोंद घ्यावी व संबंधित व्यापाऱ्याविरुध्द कडक कारवाई करण्यात येईल.८) कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी किमान आधारभुत किंमतीने सी.सी. आय ला कापूस विक्री करण्यासाठी कपास किसान या मोबाईल अॅपव्दारे स्वतःची नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी बाजार समिती कार्यालयाशी संपर्क साधावे.करीता आपण रात्रंदिवस काबाडकष्ट करून पिकविलेल्या मालाला योग्य दाम मिळण्यासाठी आणि अचुक व्यवहार होण्यासाठी कृपया आपण आपला शेतमाल मांबादच्या मार्केट यार्डातच विक्रीस आणावा असे आवाहन करण्यात येते.सि.डी.पाटीलसचिवएस.एस. गायकवाडप्रशासक तथा जिल्हा उपनिबंधकसहकारी संस्था जि. नांदेडकृषि उत्पन्न बाजार समिती धर्माबाद

श्रमिक एकजूट कृषि उत्पन्न बाजार समिती धर्माबाद तर्फेसर्व शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, गुमास्ता व हमाल बांधवांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभ दीपावली.        
Previous Post Next Post