जीएसटी तील कपातीमुळे शेतकऱ्यांना फायदा होणार - विनोद जाधव _______________________________________________________. (मंगरूळपीर-)-शेलुबाजार मंडळ आयोजित भाजपा GST कार्यशाळा संपन्न आमदार श्री श्यामभाऊ खोडे व भाजपा जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे यांचे मार्गदर्शनात विधानसभा मतदारसंघ अंतर्गत येत असलेल्या सर्व भाजपा मंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने सेवा पंधरवाडा म्हणून भाजपाचे विविध कार्यक्रमांद्वारे साजरा केला जात आहे त्याच अनुषंगाने शेलुबाजार येथे भाजपा शेलुबाजार मंडळाने आयोजित केलेल्या भाजपाच्या जीएसटी कार्यशाळेत मुख्य वक्ते म्हणून बोलताना विनोद पाटील जाधव यांनी म्हटले की जीएसटीतील कपातीमुळे आता शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.खते स्वस्त होणार असून जीएसटी हा १२ व १८ टक्क्यावरून ५ टक्के करण्यात आला आहे तसेच कृषी यंत्रावरील GST सुद्धा १२ टक्क्यावरून ५ टक्के करण्यात आला आहे. केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षापासून १२ लाखाचे उत्पादने करमुक्त केली शिवाय जीएसटी २.० च्या सुलभीकरणामुळे दैनंदिन वापराच्या ९९% वस्तू ५ टक्के गटात आल्या आहेत या दोन्हीचा एकत्रित परिणाम पाहिला तर गेल्या वर्षभरात जनतेची 2.5 लाख कोटी रुपयांहून अधिक बचत होऊ शकते शकेल त्याचा सर्वाधिक लाभ गरीबीतून आत्ताच बाहेर आलेल्या 25 कोटी नऊ मध्यम वर्गाला होणार असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकताच केला आहे केला असल्याचे जाधव यांनी म्हटले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी असलेले किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष गंगादीप पाटील, भाजपा मंडळाध्यक्ष सुदर्शन धोटे,सुरेशभाऊ राऊत,मनोज राऊत,शिवम व्यवहारे यांचेही समायोजित भाषणे झाली. कार्यक्रमाला मंडळातील भाजपा पदाधिकारी,बुथ प्रमुख,कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रवी बारड तर आभार कैलास जाजू यांनी केले.
byMEDIA POLICE TIME
-
0