पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रगटीकरणाची दमदार कामगिरी. पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रगटीकरन पथकाचे अंमलदार हे पोस्टे परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना मुखबिर कडुन खात्रीशीर खबर मिळाली की, वाघोली गोविंदपूर शेत शिवरात गोपाल भट रा. वाघोली नावाचा इसम महो दारू काढण्याचा मोहा सडवा रसायन तयार करीत आहे. अशी खात्रीषीर माहिती मिळाल्याने सदर माहीती मा. अनिल राऊत पोलीस निरीक्षक सा. यांना देवून त्याचे आदेशाने वाघोली येथे पोस्टाँप सह रवाना होवून खबरेप्रमाने वाघोली गोविंदपूर शेत शिवर येथे पंचासमक्ष जाऊन दारू रेड केला असता तिथे " गोपाल भावरावजी भट वय 35वर्ष रा. वाघोली ता. हिंगणघाट जि. वर्धा हा मिळून आल्याने मोक्यावर पाहणी केली असता दोन मोठया प्लास्टिक ड्रम मध्ये व एका लहान प्लास्टिक ड्राम मध्ये मोहा सडवा रसायन मिळून आले अजु बाजूला शोध घेतला असता दोन मोठ्या प्लास्टिक कॅन मध्ये, व दोन लहान प्लास्टिक कॅन मध्ये गावठी मोहा दारू असा जु. कि. 50,900/- माल मिळून आला पंचासमक्ष मौक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून सदर माल जप्त करून गुन्हा नोंद करण्यात आला. ही संपूर्ण कारवाई मा.पोलीस अधीक्षक अनुराग जैन साहेब, मा.अप्पर पोलीस अधीक्षक सदाशीव वाघमारे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक सा. व मा. अनिल राऊत पोलीस निरीक्षक सा. हिंगणघाट यांचे आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील सपोनि पद्ममाकर मुंडे सा. यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात डि.बी. पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना राजेश शेंडे, पोशी आशिष नेवारे,पो.शि. मंगेश वाघमारे, पोशी रोहीत साठे यांनी केली. सदर गुन्हयांचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करत आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0