चोपडा येथे पोलिस विभागातर्फे झालेल्या एकता दौड चा फियास्को. चोपडा येथे आज सकाळी 6.00 वाजता सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंती दिनानिमित्त रन फॉर युनिटी एकता दौड जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते प्रताप विद्यामंदिर पर्यंत ही दौड काढण्यात आली होती,मात्र एकता दौड ही फक्त नावाला दिसली.कोणीही विद्यार्थी,नागरिक अथवा राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी या दौड मध्ये दिसून आले नाहीत. कोणीही दिसत नसल्याने पोलिसांनी अक्षरशः मजुरांना या दौड साठी उभे करण्याची नामुष्की ओढवली.या दौड मध्ये कोणतेही राजकीय नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते दिसून आले नाहीत. पोलीस कर्मचाऱ्यांनी जे कोणी मजूर कामावर जाणारे होते त्यांना एकत्रित करून फोटोसेशन केले आणि नंतर एकता दौड काढण्यात आली. पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी रात्री उशिरापर्यंत अकरा वाजून सतरा मिनिटांनी ग्रुप वर मेसेज टाकला कुठल्याही प्रकारचे नियोजित केले नसल्याचे यातून दिसून येते. रीतसर कार्यक्रमाचे आयोजन करायचे म्हणून करण्यात आल्याचे यातून स्पष्ट होत आहे. वेळ सकाळी सहा ची दिली असतांना कार्यक्रम मात्र सुरू झाला सात वाजता. दोन दिवस आधी संदेश न दिल्यामुळे या एकता दौड मध्ये तालुक्यातील नागरिकांनी याकडे पाठ फिरवल्याने या दौड चा चोपडा येथे फियास्को झाल्याचेच चित्र दिसत होते. महापुरुषांच्या जयंतीनिमित्त जे काही नियोजन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात येते यावर स्थानिक अधिकारी कशाप्रकारे नियोजन करतात हे आजच्या दौडचे जिवंत उदाहरण आहे कार्यक्रम हा तालुका वाशियांसाठी होता का फक्त पोलीस कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा प्रश्न आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0