कृषी पुत्र मंगेश साबळे यांच्या आमरण उपोषणाकडे मात्र शेतकऱ्यांचे दुर्लक्ष- पत्रकार अंबादास संतोष जाधव यांचं वक्तव्य. सिल्लोड तहसील कार्यालयासमोर कृषी पुत्र सरपंच मंगेश साबळे यांचे सहा दिवसापासून आमरण उपोषण करीत असून , आज रोजी 4/ 10/ 2025 रोजी त्यांची तब्येत सिरीयस झाली होती , तरीसुद्धा साबळे यांनी आंदोलन चालूच ठेवले, एवढे करून सुद्धा शेतकऱ्यांनी मात्र या उपोषणाकडे दुर्लक्ष केलेले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचे ,व शेतकऱ्यांचे समस्यांचे समाधान होण्यासाठी प्रयत्न करणारे क्रांतिकारी विचारांचे लोक मात्र या विषयामुळे नाराज झालेले आहेत, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी संघटित होऊन सरपंच मंगेश साबळे यांना पाठिंबा देत, शेतकऱ्याच्या हितासाठी व शेतकऱ्यांच्या समस्यांचे समाधान होण्यासाठी राजनीतिक पक्षाची परवा न करता ,शेतकऱ्याच्या या मागणीसाठी तहसील कार्यालय सिल्लोड येथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित व्हायला हवे , शासकीय , प्रशासकीय व राजनीतिक नेते यांना शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव का मिळत नाही व शेतकऱ्यांना कर्जमाफी, व शेतातील मालाची नुकसान भरपाई द्यावी ,यासाठी शासन प्रशासन यांना धारेवर धरावे ,व आपली मागणी पूर्ण करण्यास सरकारला भाग पाडावे, तरच जगाला पोसणारा पोशिंदा वाचेल,
byMEDIA POLICE TIME
-
0