*संचालक मंडळ ठरलेले प्रगतीचे प्रतीक - पालकमंत्री गुलाबराव पाटील*४.५० कोटींच्या कामांनी बाजार समितीचे विकासद्वार खुले ; पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पणदररोज लिलाव, तात्काळ पेमेंट - आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे*. (चोपडा, दि ( संजीव) ४ ऑक्टोंबर - संचालक मंडळाच्या मनात आलं तर बाजार समितीची नक्की प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. शेतकऱ्याच्या रक्तमासातून उभी राहिलेली ही संस्था अधिक बळकट व्हायला हवी असे सांगून आज प्रत्येक गावात रावण जिवंत आहेत. राजकारणात विरोधक असलाच पाहिजे, कारण विरोधक हा होका यंत्र असतो. अशी बोचरी टीका पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली.*चोपडा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते बाजार समितीच्या आवारात मोठ्या उत्साहात पार पडले.*या कामाचे झाले भूमिपूजन*या विकास कामांत मुख्य मार्केट यार्डमधील शॉपिंग व हॉल बांधकाम, गलंगी येथे गोडाऊन भूमिपूजन, बाजार समितीच्या गोडाऊन मागील भिंत दुरुस्ती, शेतकरी निवासाच्या मागे वॉल कंपाऊंड बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले आणि एका नवीन जेसीबी मशिनचे लोकार्पण करण्यात आले असून एकूण ४.५० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.“मागील काळात पंधरा-पंधरा दिवस लिलाव होत नव्हते. मात्र आता दररोज लिलाव होत असून शेतकऱ्यांना लगेच पेमेंट मिळते. संचालक मंडळाने कोट्यवधी रुपयांची उलाढाल वाढवली आहे. नव्या जेसीबी मशिनमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. विकास आड येणाऱ्या झारीतील शुक्राचार्यांना आता बाजूला करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी केले.*यांची होती उपस्थिती*या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार लताताई सोनवणे, जिल्हा बँकेचे संचालक घनश्याम अग्रवाल, दूध संघाचे संचालक रोहित निकम, सभापती नरेंद्र पाटील, उपसभापती विनायकराव चव्हाण, रावसाहेब पाटील (संचालक), गोपाल पाटील, शिवराज पाटील, विजय पाटील, सुनिल जैन, किरण देवराज, डॉ मनोज सनेर, नंदकिशोर सांगोरे, सौ. कल्पना पाटील, सुनिल अग्रवाल, सूर्यभान पाटील सर, नितीन पाटील, रोहिदास सोनवणे (सचिव), जितेंद्र देशमुख (उपसचिव), चंद्रशेषर पाटील, राजेंद्र पाटील, नामदेव पाटील, विकास पाटील, प्रताप अण्णा पाटील, कांतीलाल पाटील सर, पिंटू पावरा, सौ. आनिता शिरसाठ, सौ. संध्या महाजन, सौ. शीतल देवराज, ए.के. गंभीर सर, राकेश पाटील, रविंद्र सोनवणे, गोपल चौधरी, सौ. सुरेखा कोळी, सौ. मनीषा पाटील, सौ. सविता पाटील गिरीश देशमुख आणि नवलसिंह राजे पाटील यांच्यासह संचालक मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील, रोहित निकम व ऍड. शिवराज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आर. एस. पाटील यांनी केले.
byMEDIA POLICE TIME
-
0